राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत धनंजय सोनार द्वितीय

0
20

 

 

 

 

मालेगाव – क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज ” _ प्रतिनिधी  नामदार जयंत पाटील यांचे वाढदिवसा निमित्त धुळे येथे आयोजित स्पर्धेत अमळनेर प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने ‘महिला अत्याचार-कारणे व उपाय’ या विषयावर प्रभावी मांडणी करून रसिकांची दाद मिळविली. त्यास द्वितीय क्रमांक, पाच हजार रुपये व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांचे हस्ते उद्धघाटन झालेल्या या स्पर्धेत राज्यातून एकसष्ट स्पर्धकांनी जोरदार मतप्रदर्शन केले, यात मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाचा महेश अहिरे यास प्रथम पारितोषिक मिळाले.
प्रा विवेक चित्ते, प्रा उदय येशे, डॉ सदाशिव सूर्यवंशी यांनी परीक्षण केले.
इतिहास अभ्यासक चेतन गुलाबराव पाटील प्रा सतीश अहिरे, सुयश ठाकूर, मानसी भावसार, देविका बागुल, हर्षल पाटील व धुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
प्राचार्य विजय बहिरम, प्राचार्या ज्योती राणे, प्रा डॉ नितीन पाटील, प्रा डॉ रमेश माने, प्रा डॉ संदीप नेरकर, उपप्राचार्य उल्हास मोरे, पत्रकार डिगंबर महाले, संजय सोनार, डॉ जी एम पाटील, सतीश देशमुख, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अनिल गोटे, सारांश सोनार, रवींद्र विसपुते, श्याम सोनार, महेश निकुंभ, विशाल विसपुते, सुमित वीसपुते, गणेश खरोटे, मुकुंद विसपुते, अमळनेर शहर व तालुका पत्रकार बांधव तसेच सुवर्णकार समाजाने निर्भय धनंजय सोनार याचे अभिनंदन केले.
—– * महाराष्ट्र न्यूज साठी बातम्या तसेच आपल्या परिसरातील घडामोडी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील घराघरात पोहोचण्यासाठी आजच महाराष्ट्र न्यूज शी संपर्क करा , तसेच पत्रकार व संपादकांच्या विविध पदांवर नियुक्ती करणे आहे. संपर्क : भारत पवार, मुख्य संपादक , कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” संपर्क _ 9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here