फोडाफोडी चे राजकारण जोरात: मुंबई महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात इच्छुकांचा होऊ लागला कहर ..! शिवसेना आणि भाजप नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाला येऊ लागला बहर ..!!
1 min read
नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” नेट वर्क राजू केदारे _ नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आखाड्याला रंग चढत असताना शिवसेना आणि भाजपमध्ये नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाला चांगलाच ऊत आला आहे. २०२० मध्ये भाजप सोडून शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्या सीबीडी सेक्टर आठ येथील माजी नगरसेविका सुरेखा नरबागे आज पुन्हा शिवसेना सोडून भाजपमध्ये दाखल झाल्या. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीच भाजप सोडून १४ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. यामध्ये ऐरोलीमधील नगरसेवकांचा आकडा मोठा आहे. गेल्या वर्षी भाजपसोडून सीबीडी सेक्टर आठ येथील माजी नगरसेविका सुरेखा नरबागे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आज पुन्हा त्यांनी घरवापसी करत भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून भाजपकडून आता फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याचे समोर आले आहे. शिवसेनेला जशाच तसे उत्तर दिले जाईल, असे भाजप नेते गणेश नाईक यांनी नुकतेच तुर्भे येथील कार्यक्रमात जाहीर करत विरोधकांनी जेवढे नगरसेवक फोडले त्यापेक्षा तिप्पट नगरसेवक मी फोडेन, असा इशारा दिला. या घटनेला आठवडाही उलटत नाही तोच नरबागे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. निवडणुकीला एकीकडे रंग चढत असताना दुसरीकडे कुणी कुणाला मोठे केले. कोण कुणाला दमबाजी करतो. यावर अधिक राजकीय चर्चा सुरू आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेविकेने शिवसेनेचं शिवबंधन सोडून भाजपमध्ये घरवापसी केली आहे. नगरसेविका सुरेखा नरबागे पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल झााल्या आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी गणेश नाईक सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. तर, ‘भाजपमधून इतर पक्षात गेलेले अनेक नगरसेवक पुन्हा भाजपात येण्यास इच्छुक आहे,’ असा दावा भाजप आमदार गणेश नाईकांनी केला आहे. त्यामुळे नाईकांची ही नवी राजकीय खेळी कितपत यशस्वी ठरणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.अर्थात फोडाफोडीचे राजकारण जोरात असून महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात इच्छुकांचा होऊ लागला कहर तर शिवसेना आणि भाजप नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाला येऊ लागला बहर असे चित्र सद्या निर्माण झाले आहे.

* राज्यात होऊ घातलेल्या नगर पंचायत, ठाणे , मुंबई महानगर पालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची मुलाखत अर्थात तुम्ही केलेले समाज कार्य,प्रभाग,वार्ड विकास यासह अण्य माहिती अत्यंत अल्प दरात प्रसिध्द केली जाईल.व अगदी कमी वेळात म्हणजे पाच मिनिटात आपल्या स्वतःच्या प्रभागासह , वार्ड सह संपूर्ण राज्यातील मतदारां पर्यंत पोहचणार … त्या साठी आजच संपर्क करा _ क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज ” भारत पवार ,मुख्य संपादक _ 9158417131 , राजू केदारे _ नवी मुंबई , प्रतिनिधी _ 9594953810 / 8779516077