मालेगाव विभागाचे आर. टी. ओ.किरण बिडकर यांचे मार्गदर्शन, देवळा आणि कळवण मोटार ड्रायव्हिंग स्कूल तर्फे केले आयोजन ,32 व्या रस्ता सुरक्षा अभियानात गिनिज बुकात नोंद असलेल्या अख्तर पटेल यांचे झाले आगमन …!

0
17

देवळा : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” न्यूज नेटवर्क _ भारत पवार _ दर वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी शासन नियानुसार मोटार वाहन अधिकारी यांचे तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता सुरक्षा अभियान जोरदार राबविले जाते.त्यामुळे वाहन चालकांना अनेक माहिती मान्यवरांन कडून मिळते. नाशिक जिल्ह्यात विविध तालुक्यात व शहरात हे अभियान राबविले जात आहे.कळवण ,देवळा व मालेगाव विभागात 32 व्या रस्ता सुरक्षा अभियान मालेगाव विभागाचे आर. टी. ओ.किरण बिडकर यांचे मार्गदर्शनाखाली कळवण , देवळा येथे नुकतेच राबविले गेले. कार्यक्रमाचे आयोजन कळवण मोटार ड्रायव्हिंग स्कूल व देवळा मोटार ड्रायव्हिंग स्कूल तर्फे संचालक दिनेश सूर्यवंशी यांनी केले .कार्यक्रमास गिनिज बुकमध्ये नावाची नोंद असलेल्या अख्तर पटेल यांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली.त्यामुळे देवळा आणि कळवण तालुक्यातील व परिसरातील वाहन चालक तसेच मालेगाव उपप्रादेशिक कार्यालयातील सर्व अधिकारी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक व देवळा,कळवण मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक दिनेश सूर्यवंशी यांच्या हस्ते गिनीज बुकमध्ये नावाची नोंद असलेल्या अख्तर पटेल तसेच   आर. टी. ओ.किरण बिडकर ,वाहन निरीक्षक पी.जी.पाटील,अभिषेक अहिरे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आर. टी. ओ.किरण बिडकर यांनी उपस्थित असलेल्या वाहन चालकांना रस्ता सुरक्षा अभियाना विषयी माहिती देऊन वाहनाच्या नियमाचे काटेकोर पालन व काळजी कशी घ्याल याविषयी सखोल मार्गदर्शन केले.अनेक अनेक ट्रॅक्टर व अन्य वाहनांना स्टिकर व रिफ्लेक्टर लावण्यात आले. अभियानात मालेगाव आर. टी. ओ.कार्यालयातील डेप्युटी.आर.टी. ओ. पी.जी.पाटील,व अभिषेक अहिरे,अतुल सूर्यवंशी,नरेंद्र जाधव,जयकर,बोधले आदी वाहन निरीक्षक उपस्थित होते. आर.टी ओ.किरण बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास शेतकरी व वाहनचालकांची गर्दी विशेष लक्षणीय ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here