Home Breaking देवळा येथे २९जानेवारी2021 ऐतिहासिक दिवस ठरला ,सुनील आहेर कृषी मार्केट यार्ड येथे...

देवळा येथे २९जानेवारी2021 ऐतिहासिक दिवस ठरला ,सुनील आहेर कृषी मार्केट यार्ड येथे कांदा खरेदीचा शुभारंभ झाला , राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला

0
67

देवळा :_ क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज “_ भारत पवार यांचे कडून खास वृत्तान्त _ नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील आणि देवळा येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे देवळा तालुका अध्यक्ष चांदवड आणि देवळा तालुक्यातील विकास कामांची तोफ आणि देवळा व चांदवड तालुक्यातील युवकांच्या तसेच अनेक मान्यवरांच्या मनात ठाण मांडून बसलेले सुनील उर्फ गोटू आबा आहेर यांचा वाढदिवस नेहमीप्रमाणे 29 जानेवारी उत्साहात साजरा केला जात असतो परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी करावे म्हणून स्वतः सुनील आहेर यांनी सुनील आहेर कृषी मार्केट यार्ड स्थापन केले आणि अनेक भाजीपाला तसेच फळफळावळ यांचा लिलावाचा शुभारंभ या ठिकाणी केला गेला परंतु 29 जानेवारी रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून कांदा लिलाव सुरू करण्याचे ठरविले गेले आणि त्याप्रमाणे आयोजन करून दिनांक 29 जानेवारी वाढदिवसाच्या निमित्ताने सुनील आहेर कृषी मार्केट यार्ड देवळा येथे पाच कांद्यांचे ट्रॅक्टरचा लिलाव करण्यात आला ३५०० ₹प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात आली आणि यापुढे दररोज सुनील आहेर कृषी मार्केट यार्ड देवळा येथे कांद्याचा लिलाव  नियमित केला जाईल असे सुतोवाच सुनील उर्फ गोटू आबा आहेर यांनी यावेळी जाहीर केले. अर्थातच 29 जानेवारी हा दिवस देवळा आणि चांदवड तालुक्यासाठी ऐतिहासिक दिवस ठरला. कार्यक्रमास राष्ट्रवादीच्या अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली होती प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र पगार, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे देवळा तालुका अध्यक्ष सुनील उर्फ गोटू आबा आहेर ,देवळा नगरपंचायतीच्या नगरसेविका वत्सलाताई आहेर ,पि.के .आप्पा आहेर पतसंस्थेचे चेअरमन प्रफुल्ल आहेर, जि प सदस्य नूतन ताई आहेर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळा तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाट ,आकाश पगार ,राष्ट्रवादी युवक सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पवार ,राष्ट्रवादी युवक नाशिक तालुका अध्यक्ष गणेश गायधनी, राष्ट्रवादी युवक दिंडोरी तालुका अध्यक्ष श्याम हिरे ,राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष गणेश पवार ,राजेंद्र सूर्यवंशी ,बापू बोरसे, धनंजय बोरसे ,विलास मोरे ,भूषण पवार ,अर्जुन मढे ,प्रफुल्ल सोनवणे, गोरख अहिरे ,जगन्नाथ निकम ,आबा सोनवणे, सुभाष निकम ,मयूर आहेर ,तुषार आहेर ,केतन आहेर ,राहुल पवार , क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज चे पत्रकार- प्रमोद पवार आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुनील आहेर मार्केट यार्ड चे संचालक ललित निकम यांनी तर कार्यक्रमाचे आयोजक मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व कर्मचारी वर्गाने केले.

* पाहिजेत_ महाराष्ट्रातील घराघरातील वाचकांच्या मनामनात बसलेले आणि घरा घरात पोहोचलेले राज्यातील समस्त वाचकांनी पसंत केलेल्या कसमादे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज” साठी तुमच्या परिसरातील घडणाऱ्या घडामोडी तसेच बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करावा” जाहिरात दर कमी महाराष्ट्र राज्यातील घराघरात पोहोचण्याची आमची हमी “तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या गावागावात पत्रकार व संपादकांच्या विविध पदांवर नियुक्ती करणे आहे ,जनसंपर्क भरपूर असणाऱ्यांनी व लिखाणाची आवड असणाऱ्यांनी तसेच पत्रकारितेत आपले नाव उज्वल करणाऱ्यांनी तात्काळ संपर्क करावा . संपर्क _भारत पवार, मुख्य संपादक ,महाराष्ट्र न्यूज.” मो.9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here