बागलाण(सटाणा) तालुक्यातील वड्याचे पाडे गजबजले डौलाने ध्वजारोहण संपन्न झाले

0
18

 

बागलाण :कसमादे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज “_ अजय ठाकरे यांचे कडून _

(बागलान) वड्याचे पाडे :- आज ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सोशल ङिस्टिंगचे काटेकोरपणे पालन करुण प्रजासत्ताक दिन साजरा केला. तिरंगा ध्वजाचे पुजन तथा ध्वजारोहण श्री.बाबुराव वाळु बागुल यांच्या हस्ते ध्वजारोहण फडकवले गेले. सर्वप्रथम ङॉ बाबासाहेब आंबेङकर , महात्मा गांधी, सरस्वती देवी प्रतिमेचे पुजन करण्यात आले तसेच मुख्याध्यापक श्री.नितिन जिभाऊ सावकार उपशिक्षक श्री.रविंद्र वामन चौरे सर . यावेळी सुद्धा थोर व्यक्तीमत्वाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्राथमिक शाळा येथे त्यानिमित्ताने मुला-मुलींना शालेय गणवेश व डिजिटल पाट्या वाटप केल्या. तसेच जिल्हा परिषदे प्राथमिक शाळा इयत्ता पहिली ते चौथीच्या मुला-मुलींनी प्रजासत्ताक दिन निमित्ताने भाषण केले. यावेळी कार्यक्रमाला सरपंच ,उपसपंच सदस्य ,व ईतर कर्मचारि व गावातील नागरीक व महिलांची उपस्थीती होती ,व कार्यक्रमाला सोशल ङिस्टिंगचे पालन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here