मालेगाव महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जी पणा, रहिवाशांनो घानिस बळकटी आना , फक्त दर महा आम्हास पगार आणा ,स्वच्छ मालेगाव उरले कागदावर, घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले रस्त्यावर,स्वच्छ मालेगाव संकल्पनेची लागली वाट ,महापौर,उपमहापौर आणि सद्या निष्काळजी असलेले आयुक्त चालू करतील का स्वच्छतेचा घाट _ भारत पवार ..

0
86

मालेगाव : दि.१९ क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज “_ नासिक जिल्ह्यातील मालेगाव महानगर पालिकेच्या कारभारात दिवसेंदिवस गलथान आणि भोंगळ कारभार वाढत असून ह्या कारभारात महापौर आणि सेनेचे उपमहापौर निलेश आहेर तसेच आयुक्त कासार यांचा अधिकारी, स्वच्छता निरीक्षक ,मुकादम यांचेवर वचक राहिलेला नाही असे दिसते ,त्यामुळेच मालेगाव महानगर ने ” बकाल , गलिच्छ ” रूप धारण केले असल्यामुळे कॅम्प भागातील प्रकाश हौसिंग सोसायटी, साने गुरुजी नगर येथे घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी आपला सुगंध अधिक तीव्र स्वरूपात येथील नागरिकांना देत आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य व जनजीवन धोक्यात आले असून साथीचे रोग आणि करोणा महामारी स आमंत्रण दिले जात असल्याचा प्रकार महापालिका अधिकारी,कर्मचारी पर्यायाने सफाई कामगार कडून होत आहे म्हणून येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.मालेगाव येथील कॅम्प भागातील हिम्मत नगर रोड लगत असलेल्या प्रकाश हौसिंग सोसायटी ,सानेगुरुजी नगर , पंचशील नगर भागात नुकताच कामानिमित्त त्या भागात जाण्याचा योग आला तेथील स्वच्छते बाबत पूर्ण बारा वाजले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हरित मालेगाव , स्वच्छ मालेगाव ही संकल्पना पूर्वी जोमात होती आता तर हीच संकल्पना कोमात गेली असल्याचे चित्र दिसत असून येथील मुतारी ( शौचालय ) घाणीने बरबटले आहेत स्वच्छते बाबतचा गवगवा करणारे आणि कर्तव्यनिष्ठ असलेले महानगर पालिकेचे महापौर , सत्ताधारी शासनाचे सेनेचे उपमहापौर निलेश आहेर ,आयुक्त कासार ,उपआयुक्त कापडणीस यांनी जर आपल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन आणि खल्या मिठास जागून कर्तव्यात कसूर न करता जनहिताच्या सुविधां साठी आपण आहोत आणि त्याच कामाचे शासन आपणास पगार देऊन शासन आपले सांभाळ करते ही भावना जोपासून वरील सर्व अधिकाऱ्यांनी वार्ड,प्रभाग मध्ये पायी फिरून पाहणी केल्यास खरोखर घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी बोकाळले ली दिसून येईल .व आपण आपले खरे कर्तव्य पार पाडले याचे समाधान तुम्हास नक्कीच मिळेल अशी संतापजनक मागणी संपादक / पत्रकार तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व माहिती अधिकार का.महासंघाचे कार्याध्क्ष भारत पवार यांनी प्रसिध्दी माध्यमाद्वारे केली आहे.सानेगुरुजी नगर जवळील प्रकाश हौसिंग सोसायटी शेजारी असलेले देवी मंदिराच्या डाव्या बाजूस असलेल्या जागेवर घाणीचे साम्राज्य पसरलेले असून ही घान डुक्कर नेहमी इतरत्र पूर्ण रस्त्यावर पसरवत असतात तर घाणी मुळे सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे देविमंदिर चे पावित्र्य पूर्ण धोक्यात आले तर आहेच परंतु नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . येथील घाण न चुकता रोज सफाई कामगार कडून उचलली जाणे गरचे असताना सुध्दा उचलली जात नाही तसेच मुतारी (शौचालय ) खूपच दुर्गंधी चे झाले असून सफाई कर्मचारी कडून रोजच सफाई करून किमान चार बादली पाणी रोज टाकून स्वच्छता केली जाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असते ते रोज स्वच्छ केले जात नाही मग आपण फक्त पगार घेऊन शासनातर्फे पोसले जात आहात मग  शासनाने आपणास दत्तक घेतले काय ? असा संतप्त सवाल भारत पवार यांनी केला असून वरील भागातील स्वच्छता रोजच केली जावी अशी मागणी यावेळी संपादक भारत पवार यांनी केली आहे.हरित मालेगाव ,स्वच्छ मालेगाव ही संकल्पना सद्या कागदावरच राहिली असून ती कागदाच्या बाहेर काढून स्वच्छतेला लागलेला गालबोट धुऊन टाकावा तरच आपणास कर्तव्याची जाणीव होईल असे ही पवार यांनी म्हटले.झाला पगार आणि आयुक्त,उपआयुक्त पसार ? अशी स्थिती आहे झाल्याचे दिसते आहे म्हणून ….. पसार असे म्हणण्याची वेळ येणार नाही असे चांगले कार्य आपणा कडून का होऊ नये ? असा उपरोधिक टोला भारत पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लगावला.वरील बातमीची तातडीने दखल घेऊन जनतेस दुर्गंधी मुक्त करून कायम परिसर स्वच्छ,सुंदर राहील याबाबत कठोर पाऊले उचलून जनतेस साथीच्या रोगापासून दूर करावे त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत अशीही मागणी यावेळी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here