मुंबई महपालिकेकडून महानगरात विविध उपक्रम

0
33

नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी_ स्वच्छ नवी मुंबई या संकल्पनेला अनुसरून नवी मुंबई महापालिका स्वच्छताविषयक विविध अभिनव उपक्रम राबविताना दिसत आहे. त्याच अनुषंगाने स्वच्छतेचाच मtहत्वाचा भाग असलेल्या शौचालयांकडेही महापालिका विशेष लक्ष देत असून शौचालयांविषयी अभिनव संकल्पना राबवित ‘एमएमटी’च्या दोन वापरात नसलेल्या बसेसचे कलात्मक रूपांतरण करून त्याचा वापर मोबाईल टॉयलेटमध्ये करण्यात आलेला आहे. अशा दोन अप सायकल आर्ट टॉयलेट बसेस मंगळवारपासून नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्यात आले.
एनएमएमटी च्या
वापरात नसलेल्या दोन बसेसचे रूपांतरण करून तयार करण्यात आलेल्या मोबाईल टॉयलेटचे लोकार्पण अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात करण्यात आले.प्रत्येक बसच्या पुढील भागात महिलांकरिता व मागील भागात पुरूषांकरीता स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. पुरूष व महिलांसाठी प्रवेशाकरिता दोन्ही बाजूस स्वतंत्र दरवाजे आहेत. आतील भागात महिलांसाठी तीन शौचकूपांची तसेच पुरूषांसाठी 2 शौचकुपांची व्यवस्था आहे व पुरूषांच्या भागात 2 मुतारी व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. याशिवाय 2 वॉश बेसीन देखील आहेत. या बसेसच्या टपावर पाण्याची टाकी बसविण्यात आलेली असून सर्व गोष्टींचा विचार करून ही मोबाईल टॉयलेट बस नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झालेली आहे. या दोन्ही वापरात नसलेल्या बसेसचे मे. सारा फ्लास्ट प्रा.लि. यांनी मोबाईल टॉयलेटमध्ये रूपांतरण केले असून ग्लोबल ग्रीन इनोव्हेटर्स यांनी अत्यंत आकर्षक रितीने अप सायकल आर्ट टॉयलेट बस कलात्मक स्वरूपात साकारली आहे. या कलात्मकतेमध्ये जसपाल सिंग नोएल. बिनॉय के, निखील एम. आणि आर्टिस्ट संकल्प पाटील, सुधीर शेडगे व वैभव घाग यांचे मोलाचे सहकार्य सहकार्य लाभले आहे. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहोब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त क्रांती पाटील, उप मुख्य स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे, उपअभियंता वसंत पडघन आणि इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here