वीजबिल दर वाढविरुद्ध मनसेचा भव्य मोर्चा संपन्न तर सरकारने दिलासा द्यावा अन्यथा पुढील आंदोलन मंत्रालयावर होणार _ गजानन काळे

0
21

 

 

नवी मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज साठी राजू केदारे _ एप्रिल महिन्यापासून कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचं अपरिमित आर्थिक नुकसान झालं. एका बाजूला आजाराची भीती आणि दुसरीकडे ठप्प झालेलं अर्थकारण ह्या दोन्ही आघाड्यांवर नागरिक लढा देत असताना, महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीजबिल पाठवून शॉक दिला. या विषयावर महाराष्ट्र सैनिकांनी ठीक ठिकाणी खळ खट्याक आंदोलन केले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी उर्जामंत्र्यांची भेट घेऊन जनतेचं गाऱ्हाणं मांडलं, मंत्र्यांनी थातुर मातुर उत्तर देण्यापलीकडे काहीच नाही केले. पुढे सन्मा. राजसाहेब ठाकरेंनी हा विषय राज्यपाल महोदयांपर्यंत नेला. त्यांना ह्या विषयातील गांभीर्य जाणवत होत पण त्यांनी देखील ह्या विषयात सरकार काही करत नाही ह्याच दुःख व्यक्त केलं. त्यात १०० युनिटपर्यंत वीज देयकांमध्ये सवलत देऊ अशी भाषा करणारे ऊर्जामंत्री घुमजाव करून वीज देयक भरलच पाहिजे आणि कोणतीही सवलत मिळणार नाही अशी भाषा बोलू लागले आणि मनसेचा संयम संपला.

राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार आज नवी मुंबई मनसेने कोकण भवन वर प्रचंड मोर्चा काढला. या मोर्चात सामान्य नागरिक मोठ्या संख्येने आपला राग व्यक्त करण्यासाठी उपस्थित होते. मोर्चा सुरु होण्या अगोदर संवेदनशीलता आणि सामाजिक भान जपत २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस आणि जवानांना दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हजारोच्या संख्येने निघालेल्या मोर्चात नागरिकांनी “महाराष्ट्र सरकारचा खोट्या आश्वासनांचा भडीमार, सर्वसामान्यांवर वीजबिलाचा भार “, “मीटर रिडींग मध्ये मोठे लफडे, सर्वसामान्यांचे मोडलंय कंबरडे”, “बंद करा .. बंद करा, सामान्य जनतेला त्रास देणं बंद करा “, “केरळ, गुजरात, मध्यप्रदेश वीज बिलात ५०% सवलत देते, तर महाराष्ट्र शासन जनतेला का त्रास देते ” अशा घोषणा देऊन कोकण भवन परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्र शासनाविरुद्ध निघालेल्या या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. भूमिराज टॉवर – आग्रोळी तलाव – अर्बन हाट अशा निघालेल्या मोर्चाचे सभे मध्ये रूपांतर झालं. या सभेत शहर अध्यक्ष गजानन काळे, उप शहरअध्यक्ष निलेश बाणखिले, विनोद पार्टे, प्रसाद घोरपडे, महिला शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, उप शहर अध्यक्ष अनिता नायडू यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं. शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना वीजबिल दरवाढीचा निषेध केला. तसेच यापुढे वीजबिलात सवलत मिळाली नाही तर, पुढचे आंदोलन मंत्रालयात किंवा मंत्र्यांच्या घरी करू असा खणखणीत इशारा दिला.

सन्मा. राजसाहेब ठाकरेंनी कोकण विभागीय आयुक्त यांच्या नावे पत्र दिले होते. मनसेच्या शिष्टमंडळाने हे पत्र विभागीय आयुक्तांना सुपूर्द केलं आणि जनतेचा आक्रोश त्यांच्यासमोर मांडला. मनसेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे, उप शहरअध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे, सविनय म्हात्रे, प्रसाद घोरपडे, शहर सचिव सचिन कदम, रुपेश कदम, महिला सेना शहरअध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, उपशहर अध्यक्ष अनिता नायडू, शुभांगी बंदीचोडे, वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन खानविलकर, पालिका कामगार सेना शहर संघटक अप्पासाहेब कौठुळे, रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, शारीरिक शिक्षण शहर संघटक सागर नाईकरे, चित्रपट सेना शहर संघटक किरण सावंत, विधी विभाग शहर संघटक निलेश बागडे, शहर सहसचिव अभिजित देसाई, स्थानिक बेलापूर विभागअध्यक्ष भूषण कोळी हे उपस्थित होते.

सचिि
सेे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here