महाराष्ट्राच्या इतिहासातील मालेगाव तालुक्यातील पहिली घटना , दाभाडीच्या लोकनियुक्त सरपंचास मेरी मर्जी नडली ग्रामस्थांनी त्यांना कायमची घरची वाट दाखवली
1 min read
दाभाडी (मालेगाव ) ग्रामपंचायत कार्यालय

मालेगाव : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” साठी भारत पवार _ नासिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका कायम या _ना त्या कारणास्तव महाराष्ट्र भर चर्चेत असतोच त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातील जनतेच लक्ष विशेषतः शासनाचे लक्ष विशेष ह्या तालुक्यावर असतेच.विशेष म्हणजे मंत्री महोदय ना.दादा भुसे यांचाच तालुका असल्या मुळे गावा गावात शासनास कडून मिळणाऱ्या सुख सुविधा ,शासनाच्या जनहिता साठीच्या विविध योजना यापासून नागरिक वंचित राहू नये त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेऊन काम करावीत शासनाच्या विविध योजना प्रत्येक नागरिकास मिळावी हा हेतू नागरिकांचा आहे आणि मंत्री महोदय यांचा तालुका असल्या कारणाने जनतेच्या अपेक्षा उंचावणे साहजिकच आहे.आणि ना.दादा भुसे यांच्या तर्फे तसे प्रयत्न केले जात आहेत.परंतु जनतेच्या अपेक्षांना काळीमा फासणारी घटना घडली मालेगाव तालुक्यातील दाभाडी ह्या गावी. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील राजकीय हवा थंडीत सुद्धा गरम होऊन महाराष्ट्रभर दाभाडी गावातील लोकनियुक्त सरपंच चले जाव ची चर्चा रंगू लागली.नासिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दाभाडी हे गाव राजकीय दृष्ट्या खूप जुन्या काळापासून महाराष्ट्रात नावाजलेले आहे .ह्याच दाभाडी गावातून आज तागायत हिरे घराण्यातील 4 ते 5 मंत्री होऊन गेलेत.त्यामुळे दाभाडी गावास विशेष राजकीय वलय प्राप्त झाले आहे.आणि येवढे असुनही हे गाव विकसित कामांना पाहिजे तेवढे पावन झालेले नाही असे म्हणता येईल.भाजप ची सत्ता महाराष्ट्रात असताना त्या सरकारने लोकनियुक्त सरपंच असावा असा पायंडा काढला होता.हेच मुळात चुकीचे होते.आणि भाजपने तीच चूक उराशी घेतली होती.आणि त्यांच्या काळात जेवढ्या ग्रामपंचयती च्या निवडणुका झाल्या तेथे आजही लोक नियुक्त सरपंच कार्यरत आहेत त्यात दाभाडी गावातून सुद्धा लोकनियुक्त सरपंच म्हणून सौ.चारुशीला अमोल निकम याना ग्रामस्थांनी विश्वासाने निवडून दिले होते.आणि काही दिवसांचा कालावधी लोटतो न लोटतो सरपंचांनी मेरी सुनो औ र मेरी मर्जी लागू केली होती त्यामुळे ग्रामस्थ खूप नाराज झाले होते तर गावात विकास कामांचा , स्वच्छतेचा बोजवारा उडाला होता असे ग्रामस्थांनी सांगितले .म्हणून लोकनियुक्त सरपंच वरती अविश्वास ठराव मंजूर केला जावा अशी चर्चा गावातून झडू लागली होती आणि ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला सुद्धा परंतु लोकनियुक्त सरपंच मग पाच वर्षे पूर्ण करणार अशीही फेक चर्चा होऊ लागली परंतु ग्रामसभेला विशेष अधिकार असल्या कारणाने काही महत्वाच्या कारणास्तव विशेष ग्रामसभा घेता येत असते हा अधिकार असल्या कारणाने नेमका हा अधिकार वापरून बुधवारी मालेगाव ग्रामपंचायतीत मालेगावचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांचे नेतृत्वाखाली आणि गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.यावेळी ग्रामसभेत उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांकडून मतदान घेण्यात आले 1272 मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.महाराष्ट्रातील इतिहासातील नासिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ही पहिलीच घटना असून ग्रामस्थांनी सरपंच यांना एके काळी थेट खुर्चीवर बसवले होते आणि मेरी मर्जी मुळे आता थेट घरचा रस्ता दाखवल्या मुळे दाभाडी गावची गार हवा आता अधिक गरम झाल्याने महाराष्ट्र भर चर्चा रंगू लागली आहे.जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देणे हा बोध राजकारण्यांनी घेणे गरजेचे झाले आहे.जनता माणसात बसवते पण आणि मानसातून उठवते पण हे सुध्दा शंभर टक्के खरे आहे.याची जाणीव राजकारण करणाऱ्यांनी जरूर ठेवावी असेही ह्या घटनेवरून दिसते.