तिलोत्तमा सोनवणेनी एन.एस. चा पदभार स्वीकारला , अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला

0
37

ओझर टाऊन शिप_ क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ भारत पवार यांज कडून _ नाशिक विभागातील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड(HAL) कंपनी च्या हॉस्पिटल मध्ये नर्सिंग सुपरीटेंडेंट म्हणून तिलोत्तमा विजय सोनवणे (सावकार) यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल कडून त्यांचे अभिंदन करण्यात आले असून पुढील कामास शुभेच्छा दिल्या आहेत,तर अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. मंदा कुबेरजी ह्या सेवानिवृत्त झाल्याने सोनवणे यांनी त्यांचे कडून पदभार स्वीकारल्यानंतर एच. ए.एल.दवाखान्यातील सर्व स्टाफ ने त्यांचे अभिंदन करून भरभरून शुभेच्छा दिल्या. नीलोत्तमा सोनवणे ह्या हसतमुख,सगळ्यांशी मिळून मिसळून असल्याने सगळ्या स्टाफ आणि कर्मचारी वर्गास हव्याशा असे व्यक्तिमत्व असल्याचे महाराष्ट्र न्यूज वेब चॅनलच्या व्यवस्थापिका अनिता पवार यांनी सांगितले.एन.एस- सोनवणे यांचे जनरल मॅनेजर,असिस्टंट जनरल मॅनेजर,डॉ. अनिरुद्ध पाटील (COMS),तसेच महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल आणि क स मा दे टाइम्स न्यूज पेपर्स चे संपादक , हॉस्पिटल नर्सिंग स्टाफ,कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here