
वासोळ – कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रशांत गिरासे याज कडून –
देवळा तालुक्यातील महाल पाटणे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन पदासाठी घेण्यात आलेली निवडणूक बिनविरोध झाली असून चेअरमनपदी श्री चंद्रभान ग्यानदेव अहिरे व व्हा.चेअरमन पदी श्री मधुकर परशराम भाटेवाल यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा ग्रामीण भाजप प्रमुख श्री केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध पार पडली.
गेल्या वर्षी श्रीमती सुनीता अशोक खरोले ह्या वि का स सोसायटी चेअरमन होत्या. त्यांनी नुकताच आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक घेण्यात आली. गावातील ग्रामस्थ श्री दादाजी भाग अहिरे, श्री शिवाजी दोधा अहिरे, श्री मच्छिंद्र वाल्मीक शेलार, श्री छबु दगा भामरे श्री सागर दिलीप खरोले, मधुकर मोतीराम बच्छाव, श्री युवराज नानाजी शेलार उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी श्री संभाजी खेडकर यांनी कामकाज पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी अरुण पाटील यांचे सहकार्य मिळाले. निवडीनंतर श्री चंद्रभान अहिरे व मधुकर भाटेवाल यांचा सत्कार श्री छबु भामरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेतकरी, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
**** **** *****
पाहिजेत
कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” साठी
मुबंई, नवी मुबंई , दादर,विक्रोळी, घाटकोपर, कल्याण, ठाणे यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात पत्रकार नेमणूक करण्यात येत आहे तरी इच्छुक असलेले व पत्रकारितेत उत्तम करिअर करण्या साठी तात्काळ संपर्क करावा —
संपर्क : भारतराज पवार , मुख्य संपादक ,9158417131
प्रशांत गिरासे : प्रतिनिधी – 9359228067
प्रमोद पवार : प्रतिनिधी : 9075137518
रवींद्र बागुल : प्रतिनिधी – 8308996933
