भारत पवार : मुख्य संपादक. ९१५८४१७१३१ मालेगाव : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मालेगाव महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक असल्या कारणाने अनेक जण महानगर पालिकेत दाखल झाले होते. यावेळी इस्लाम पार्टीचे नसरीन बानो शेख यांनी महापौर पदाच्या शर्यतीत बाजी मारली . त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या लता घोडके यांना २५ मते पडल्याने पराभवास सामोरे जावे लागले .तर उपमहापौर पदी समाजवादी पक्षाचे शान _ ए _ हिंद यांची नियुक्ती झाली . त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे निलेश काकडे यांना २५ मते घेऊन पराभवाचे धनी व्हावे लागले. ही निवडणूक शांततेत पार पडल्यानंतर अनेकजण मनपाच्या इमारती वरून लिफ्टने खाली येत असताना मोठा अपघात घडला . लिफ्ट ओव्हरलोड झाल्याने ती तुटली यावेळी एकच खळबळ उडाली लीफ्ट मध्ये अडकलेले सर्वच जन बालंबाल बचावल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र यानिमित्ताने मनपाच्या या भोंगळ कारभाराची सर्वत्र जोरदार चर्चा होत असून ह्या कारभाराची चौकशीची मागणी नागरिकांनी केली आहे. हा अपघात लिफ्ट ५ व्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर असताना तुटल्याने मोठाच अनर्थ टळला. यावेळी लिpt मध्ये इस्लाम पक्षाचे संस्थापक माजी आ.आसिफ शेख यांचेसह पत्रकार , नवनिर्वाचित नगरसेवक , असे १६ / १७ जन लिpt ने सुखात प्रवास करत होते.तेव्हा त्यांच्यावर हा प्रसंग गुदरला होता.महापालिकेच्या इमारतीतील लिफ्टच्या सुरक्षितते बाबतचा प्रश्न ऐरणीवर आला असून अनेकांनी चौकशीची मागणी केली आहे.
या गंभीर घटनेची दखल तात्काळ पोलिस व अग्निशमन दलाने घेऊन लिफ्टचा मुख्य दरवाजा तोडून शिडी लाऊन अडकलेल्या सगळ्यांना बाहेर काढण्यात यश आले.
असा ठरला येथील मनपाच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा प्रवास लिफ्ट ते शिडी .








