Home Breaking महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचा केला भ्रमनिरास : जाहीर केलेली मदत तुटपुंजी , कांद्याला...

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचा केला भ्रमनिरास : जाहीर केलेली मदत तुटपुंजी , कांद्याला हमी भाव द्यावा , द्राक्ष उत्पादकांना विशेष पॅकेज जाहीर करा _ खा.भास्करराव भगरे

0
40
Oplus_131072

भारतराज  पवार : राज्य मुख्यसंपादक  तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _ लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटना. संपर्क : ९१५८४१७१३१                                                    देवळा : क.टा.  महाराष्ट्र न्यूज  ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : कुबेर जाधव  : * द्राक्ष उत्पादकांना विशेष पॅकेज जाहीर करा
📌 कांद्याला हमीभाव द्या, निर्यात सुरू करा अशी मागणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील अभ्यासू नेतृत्व असलेले  खा. भास्कर भगरे यांनी नुकतीच केंद्र सरकारकडे  संसदेत केली.  त्यांनी संसदेत बोलताना म्हटले की,

मे महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत झालेल्या सततच्या पावसामुळे लागवड केलेला कांदा खराब झाला, साठवलेला कांदाही भिजला. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने वाचवलेल्या कांद्याला भाव मिळेल अशी आशा असताना केंद्र सरकारने निर्यातीवर बंधन आणले, कांद्याचा भाव पुन्हा मातीमोल झालाअतिवृष्टीमुळे द्राक्षाच्या मुळांना रोगाचा प्रादुर्भाव झाला, खतांच्या तुटवड्यामुळे शेतकरी आणखीनच संकटात आला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील ८०% द्राक्ष बागा खराब झाल्या. द्राक्षबाग उभी करण्यासाठी हेक्टरी ५-६ लाखांचा खर्च असतो. संपूर्ण हंगाम वाया गेल्यामुळे आमचा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मात्र या शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास राज्य सरकारने केला.त्यामुळे शेतकऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे.

या परिस्थितीतून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना केंद्र सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे, कांद्याला हमीभाव द्यावा व कांदा निर्यातीवरील बंधने तातडीने उठवावी, अशी संसदेत मागणी केली. केंद्र सरकारकडून आपल्या मागण्यांवर आता तरी सकारात्मक विचार होईल, हीच नम्र अपेक्षा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here