भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी बिनधास्त संपर्क करा. मो.९१५८४१७१३१ देवळा : काटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : देवळा येथे दरवर्षाप्रमाणे ह्याहीवर्षी शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने जोरदार कार्यक्रमाची तयारी झाली असून ह्या कार्यक्रमाचे विशेष आणि दमदार आकर्षण म्हणजे देशाचे लोकप्रिय नेते आणि समस्त जनतेचे पंचप्राण शरदचंद्रजी पवार यांची भरदार उपस्थिती लक्षणीय ठरणार आहे.
सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता देवळा महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट तर्फे जोरदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष रा.का.चे मा.प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील भूषविणात असल्याचे ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव गोसावी यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.
कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू होणार असून प्रथम आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. दर वर्षी शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट तर्फे दिला जाणारा पुरस्कार यावर्षी पत्रकार विलास बढे यांना दिला जाणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले.
कार्यक्रमास अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती राहणार असून खा.भास्कर भगरे , खा. निलेश लंके, प्रवीणदादा गायकवाड , दादासाहेब सूर्यवंशी , चांदवड _ देवळा तालुक्याचे भाग्यविधाते आ. डॉ. राहुलदादा आहेर , नाफेड संचालक केदा आहेर , प्राचार्य हितेंद्रबापू आहेर , प्रा.जितेंद्र आहेर , भाऊसाहेब पगार , भूषण पगार , कोमल कोठावदे, भाऊसाहेब अहिरे, राजेंद्र देवरे , पोलिस निरीक्षक सार्थक नेहते, योगेश आहेर , पंडितबापू निकम , म.वि.प्र. संचालक विजयनाना पगार आदींची उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.






