Home Breaking पक्षा साठी चांगली ठरली भक्ती , भाजपा जिल्हाध्यक्षपदी प्रा. निलेश कचवे यांची...

पक्षा साठी चांगली ठरली भक्ती , भाजपा जिल्हाध्यक्षपदी प्रा. निलेश कचवे यांची फेर नियुक्ती ! मालेगावी आनंदाची दिवाळी तर देवा पाटील यांनी पेढे भरवून आनंद द्विगुणित केला

0
103
Oplus_131072

भारतराज पवार  , मुख्य संपादक                             आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क :  ९१५८४१७१३१                                           मालेगाव : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या वरिष्ठ स्तरावरून नुकत्याच जाहीर करण्यात आल्याने त्या त्या जिल्ह्यातील , तालुक्यातील स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यात आनंद पसरला आहे.तर आपलीच पुन्हा आहे त्याच पदावर तर कोणास बढती मिळावी म्हणून तालुका आणि जिल्हा  कार्यकर्ते , पदाधिकाऱ्यात नव्याने नियुक्त केलेल्या जिल्हाध्यक्षांकडे मोठीच लॉबिंग सुरू आहे .

मात्र मालेगाव जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्षपदी प्रा.निलेश कचवे सर यांची नव्याने फेर नियुक्ती झाल्याने येथील कार्यकर्त्यात , पदाधिकाऱ्यात आनंद पसरल्याने मोठी दिवाळी साजरी करण्यात आली तर निलेश कचवे यांच्या वर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

निलेश कचवे सरांचा मागील  कार्याचा आढावा बघता पक्षासाठी केलेली चांगली भक्ती म्हणून वरिष्ठ नेत्यांनी त्यांची दखल घेत ही फेर नियुक्ती करून त्यांच्यावर वरिष्ठांनी खुश होऊन विश्वास टाकला. वरिष्ठांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही ,पक्ष वाढीसाठी आपण मेहनत घेऊन काम करणार असल्याचे मत नवनियुक्त मालेगाव जिल्हाअध्यक्ष प्रा. निलेश कचवे सर यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलतांना सांगितले.                     तर प्रा. कचवे यांची नव्याने जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने मालेगाव भाजपा तालुकाध्यक्ष देवाभाऊ पाटील यांनी कचवे यांना पेढे भरवून आपला आनंदोत्सव साजरा केला. व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here