Home Breaking देवळा तालुक्यातून एकमेव ठरले ” आदर्श ग्रामपंचायत अधिकारी ” संभाजी देवरे ,...

देवळा तालुक्यातून एकमेव ठरले ” आदर्श ग्रामपंचायत अधिकारी ” संभाजी देवरे , सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

0
111
Oplus_131072

भारतराज पवार  : राज्य मुख्यसंपादक.  ९१५८४१७१३१.                                                       देवळा / माळवाडी : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा निवड समितीमार्फत दर वर्षी प्रत्येक तालुक्यातून आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून पुरस्कार दिला जात असतो.जिल्हा निवड समिती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात केली जाणारी शासनाच्या विविध योजनांचा केलेल्या विकास कामांचा आढावा मागवत असते. केलेल्या विकास कामांच्या आढाव्यानुसार हा पुरस्कार दिला जात असतो.

यावर्षी सन २०२३- २०२४ साठीचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून संभाजी रामभाऊ देवरे यांना हा पुरस्कार जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.

संभाजी रामभाऊ देवरे हे देवळा तालुक्यातील माळवाडी गावी ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी गेल्या वर्षापर्यंत गावात शासनाच्या विविध योजना राबविल्या असल्या कारणाने त्यांच्या कामाची पावती म्हणून जिल्हा प्रशासनाने देवळा तालुक्यातून एकमेव फक्त संभाजी देवरे यांची दखल घेऊन आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून हा आदर्श पुरस्कार एका शानदार कार्यक्रमात शनिवार दि. २२ / ३/ ०२५ रोजी गंगापूर रोड , दत्त मंदिर भवन , नाशिक येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल ( भा प्र से ) , जिल्ह्यातील प्रत्येक  तालुक्यातील गट विकास अधिकारी, अन्य पदाधिकारी ,  त्या त्या ग्रामपंचायतीतील सरपंच , उप सरपंच , ग्रामपंचायत सदस्य , पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांचे कुटुंब आणि मित्र परिवार यांच्या उपस्थितीत   प्रदान करण्यात येणार आहे.

आदर्श ग्रामपंचायत अधिकारी संभाजी रामभाऊ देवरे यांचे विविध स्तरावरून अभिनंदन केले जात असून महाराष्ट्र न्यूज चॅनल चे राज्य मुख्य संपादक मा. भारतराज पवार , चॅनल चे सर्व पत्रकार तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ , मुंबई , माळवाडी येथील सरपंच श्री व सौ.पवार , उपसरपंच मयूरजी बागुल , सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी , गावातील तरुण आणि ग्रामस्थ यांनी देवरे यांचे अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here