नाशिक दौरा पंतप्रधानांचा उधळण पैशांची , गळचेपी मात्र मतदान करणाऱ्या जनतेची…!

0
117

भारत पवार : मुख्य संपादक                                    पत्रकार नियुक्ती साठी तसेच                       आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क मो ९१५८४१७१३१                      देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौर्यावर येत आहेत , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनोखं स्वागत होण्याची सोशल मीडिया जोरदार चर्चा सुरू आहे, गळ्यात कांद्याच्या माळा घालुन स्वागत करण्यात येणार असल्याचा संशय ( कयास) पोलिसांना येत असल्याने सर्व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस विभागाचे अधिकारी समज तसेच दबक्या आवाजात दमकावत आहेत,*
नाशिक शहर व परिसरात सर्वदूर मोठ्या प्रमाणात रस्त्यांना खड्डे पडलेले असल्याने वारंवार दुरुस्ती साठी आंदोलने,मोर्चे काढून देखील खड्डे बुजविण्यात येत नव्हती ,मात्र पंतप्रधानांच्या एका दिवसाच्या दौऱ्यासाठी कोठ्यावधी रुपये उधळले जात आहेत, तपोवन मार्गावर हायफाय डांबरीकरण करण्यात येत आहे,आऊट सोर्सींग द्वारे कर्मचारी लाऊन साफसफाइ,करण्यात येऊन नाशिक नगरी सजवली जाते आहे पैशांचा असा अपव्यय होत असुन सर्व सामान्य जनता आजही रस्त्यांचे खड्डे बुजविण्यासाठी आंदोलने करीत आहे ,गल्ली बोळात भटक्य कुत्रे, डुक्कर यांनी उच्छाद घातला आहे,त्याबाबत महानगर पालिके कडे वारंवार तक्रारी करुन देखील कारवाई होत नाही आणि दुसरीकडे मोदीसाहेबांच्या सभास्थळी दोन दिवसांपासून भटके कुत्रे पकडण्याची मोहिम सुरु आहे.शहरातील गरीब भिकार्यांचे पुनर्वसन करणे ही केंद्र व राज्य सरकारची जबाबदारी असुन त्यांचे पुनर्वसन करण्या ऐवजी त्यांना स्थानबध्द करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे,
एकीकडे दुष्काळसद्रुष्य परिस्थिती, शेतीमालाला मिळणाऱ्या कवडीमोल भावाने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, दुसरीकडे बेमोसमी पाऊस व गारपीटने शेतकर्यांचे कंबरडे मोडलेले असुन शेतकरी मेटाकुटीला आला आहे.अशातच केंद्र सरकारने रातोरात कांद्याची निर्यात बंदी करून कांद्याचे दर पाडले जात असल्याने शेतकर्याचा उत्पन्नाचा खर्च देखील निघत नाही, बेमोसमी पावसाने द्राक्षबागा उध्वस्त झाल्या आहेत. खरीप व रब्बीचे पिके वाया गेली आहेत मोदी शासणाने कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी,शेतकर्यांना भरीव अशी मदत करावी.अन्यथा शासणाचे लक्ष शेतकर्यांकडे वेधन्यासाठी राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने गळ्यात कांद्याच्या माळा घालुन तसेच पंतप्रधानांना कांदा भेट देऊन आंदोलन करण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे*
*मा क्रुषी मंत्री शरद पवार यांच्यावर वसाका कार्यस्थळावर झालेल्या दुर्दैवी कांदा फेखी (2006) ची घटना कांदा उत्पादक शेतकरी अजून विसरले नाहीत*

*कुबेर जाधव ्समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here