भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज .मो.९१५८४१७१३१
मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : विलास गडाख : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने अखेर मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसानंतर संजय राऊतांना जमीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीने कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयामधील विशेष पीएमएलए कोर्टाने राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी झाली असून अखेर 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे.
आज संध्याकाळपर्यंत ते बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय राऊत यांच्या जामिनावर ईडी हायकोर्टात जाणार आहे. तर संजय राऊत यांच्या जामिनावर ईडीने स्थगिती देण्याची मागणी केली आहे. विशेष पीएमपीएल कोर्टातून खासदार संजय राऊत यांना जमीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान त्यांना संजय राऊत यांच्या जामीनाबाबत ईडी हायकोर्टामध्ये जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
पत्रचाळ प्रकरण नेमके काय?
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. परंतु त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.
प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.




