Home Breaking चंदनपुरी येथील विनोद शेलार ठरले जनतेचे तारणहार..! शेलार यांची सरपंच पदी बिनविरोध...

चंदनपुरी येथील विनोद शेलार ठरले जनतेचे तारणहार..! शेलार यांची सरपंच पदी बिनविरोध निवड ,गावात आनंदाचा जल्लोष

0
73

 

मालेगाव / चंदनपुरी _ क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज ” नेटवर्क – रविराज सोनार _ तालुक्यातील चंदनपुरी येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवड बिनविरोध पार पडली.
सरपंचपदी शिवसेना प्रणित शिव मल्हार पॅनलचे विनोद निंबा शेलार तर उपसरपंचपदी अशोक दोधा अहिरे (माजी सैनिक) यांची बिनविरोध निवडीची घोषणा अध्यासन अधिकारी किरण शिंदे यांनी केली. त्यांना ग्रामसेवक ए जे चव्हाण, लिपिक शालींदर जीवरक यांनी सहाय्य केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पवार, सौ दीपाली सोनवणे, सौ वैशाली पाटील, मनोहर जोपळे, सोनाली शेलार, मनीषा पवार, सरला अहिरे, कैलास शेलार, सविता सोनवणे, आदी उपस्तिथ होते व चार सदस्य गैरहजर होते.
बिनविरोध निवड झाल्याबद्दल राज्याचे कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी सरपंच विनोद शेलार, व उपसरपंच अशोक अहिरे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी किल्ला पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या उपस्थितीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महत्वाचे _ अल्पावधीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्‍यात घराघरात पोहोचलेले वाचकांच्या मनामनात बसलेले कसमादे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज” साठी पत्रकार आणि संपादकांच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात येत आहे पत्रकारितेत आपले नाव उज्ज्वल करण्यासाठी इच्छुक व आवड आणि जनसंपर्क असणाऱ्यांनी संपर्क करावा, तसेचआपल्या परिसरातील बातम्या इतर घडामोडी साठी तसेच राज्यातील नगरपंचायत ,महानगरपालिका , नगरपालिका यांची होऊ घातलेली निवडनुकीत  इच्छुक असलेल्या भावी उमेदवारांच्या मुलाखती अल्पदरात प्रसिद्ध करून अगदी कमी वेळात पाचच मिनिटात आपल्या प्रभागात आपल्या ,आपल्या वार्डात घराघरातील मतदारांपर्यंत तात्काळ पोहोचण्याची नामी संधी “महाराष्ट्र न्यूज” तर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे, तरी इच्छुकांनी तात्काळ संपर्क करावा. संपर्क:- भारत पवार मुख्य संपादक टाईम्स “महाराष्ट्र न्यूज, ” मो.9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here