वासोळ : क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज ” _ विशेष _कोरोना संक्रमानाच्या पार्श्वभूमीवर आज सादर झालेला अर्थसंकल्प हा महत्वाचा असून तो देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणारा अर्थसंकल्प आहे. रस्ते पाणी ,स्वछता आरोग्य या बरोबरच अनेक पायाभूत सुविधा बळकट करण्याकडे अधिकचे लक्ष देण्यात आले आहे तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या असून आता शेतमालाला हमीभावा पेक्षा दीड पट अधिक भाव मिळणार व ग्रीन ऍप च्या माध्यमातून 22 नवीन पिकांच्या शेतमाल निर्यातीस परवानगी दिली असून , मासे पालन शेती उद्योगासाठी मोठी तरतूद केली आहे ,ए. पी. एम. सी. अधिक बळकट करण्यावर भर दिला असून ई नाम साठी 1000 अधिकच्या नवीन ई बाजार उभारणार असून शेतकरी हितासाठी चा हा अर्थसंकल्प आहे. जमिनीचे कागदपत्रे डिजिटल होणार, युवांसाठी रोजगार संधी निर्माण करणारा ,आरोग्यक्षेत्रात भरीव तरतूद करणारा, सरकारी बँकांना सक्षम करणारा,नियम आणि प्रक्रियांमध्ये अधिक सुलभता आणणारा ,स्वदेशी वस्तुंना उभारी देणारा, गरीब, मध्यमवर्गीयांना, उद्योजकांना ,दिलासा देणारा, विकास आणि विश्वास यांचा संगम असणारा हा अर्थसंकल्प आहे. महत्वाचे म्हणजे नाशिक येथे मेट्रो प्रकल्पासाठी दोन हजार 92 कोटी रुपयांची तरतूद पण ह्या बजेट मध्ये करण्यात आली आहे . हा अर्थसंकल्प सर्वसामावेशक असून देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा आहे.
* संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज “करिता बातम्या व जाहिराती साठी अवश्य संपर्क करा. . संपर्क_ मुख्य संपादक ,भारत राज पवार, महाराष्ट्र न्यूज , सेक्स संपर्क :मोबाईल :9158417131.
