कळवण तालुक्याती मोहबारी येथे डोंगऱ्या देवाचे कार्यक्रम
वासोळ : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _
उत्तर महाराष्ट्रातील सातपुडा व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत अतिदुर्घम भागात डोंगराच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासींचे जीवन म्हणजे एक प्रकारची खरतर तपश्चाच म्हणावा.जीवन संघर्षाच्या वाटचालीत परंपरागत चालत आलेल्या सामुदायिक उत्सवांना व्रतांना अंत:कारणापासून जपण्याचे काम आदिवासी समाज आजही मनेभावी करत आहे.डोंगऱ्यादेव आजही आदिवासींचे महत्वपूर्ण देव मानले जातात.हे व्रत आदिवासींच्या विविध जमातींपैकी प्रमुख्याने कोकणा,महादेव कोळी,भिल्ल,वारली,पावरा,मावची आदी जमातीचे लोक मोठया प्रमाणात साजरा करतात.अशी माहिती जेष्ठ नागरिक मा.पोलिस पाटील अर्जुन भोये यांनी दिली ,सातव्या दिवशी सायंकाळी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला गावातील चोखीखळी ढाळली जाते.भगत मठावरील थोबाची विधिवत करून थोब उपटवतो त्यांच्या सोबत व्रतात सहभागी असलेल्या सर्व माऊल्या,भाया,अबाल वृद्ध,ग्रामस्थ डोंगरया देवाचे गाणे म्हणत गड घेण्यासाठी गौळाच्या दिशेने रवाना होतात.रात्री गडाच्या (गौळाच्या)पायथ्याशी मुक्काम राहतात तसेच या जागेला रानखळी असे म्हणतात.तेथे पुन्हा थोब रोवला जातो.दरम्यान गावातील प्रमुख ग्रामस्थ. भगत.मुधानी. गौळा जवळ जातात तेथे स्वछता सारवण करतात.पाच आरत्या महादऱ्या (मोठा दगडी दिवा) अगरबत्ती लावतात गौळाच्या गुहेसमोर कोरा शेला (उपरणे)धरतात.तेथे भगत कन्सरा (नागली) तांदळाचा सव्वाशे पुंजा टाकतो.संपूर्ण पूजा अर्चा झाल्यावर भगत मोठ्याने पाच वेळा लक्ष्मीचा नावाने लक्ष्मे अशा आवाज देतात.खाली रानखळीवर थोम्बा भोवती बसलेल्या मावल्या भायांच्या सूड उठतो.(अंगात संचार येते)आणि सर्व माऊल्या घुमू लागतात गाणे म्हणत नाचू लागतात
यावेळी तुकाराम गावित, रघुनाथ भोये, लक्ष्मण पवार, उत्तम भोये, शाहू चव्हाण, विठ्ठल आहिरे, पोपट भोये, पंढरिनाथ चव्हाण, माधव गावित, नामदेव चौधरी, संजय भोये, काशिनाथ गायकवाड, विजय चव्हाण, सुरेश भोये, बाळू माळी, सुनिल भोये, पंडित भोये, बाबुलाल ठाकरे, उत्तम चव्हाण , सुरेश चव्हाण, साहेबराव भोये, संजय बागुल, रुपेश भोये, राजेंद्र पवार, रमेश बहिरम, उत्तम पवार, देविदास भोये, वामन गावित, रविंद्र बर्डे सोमनाथ बर्डे व ग्रामस्थ आदि उपस्थित होते
