January 16, 2022

मालेगाव च्या चंद्रजीत ने जित पूर्ण केली ,जनतेच्या डोळ्यात धूळ फेक केली तरीही जनतेने झक मारली बैठकीस उपस्थित राहिले मात्र तहसीलदारांनी दुरुस्तीची दया नाही दाखवली मेरी सूनो कायम ठेवली : मालेगावचे तहसीलदार चंद्र्जित राजपूत यांचा गजब कारभार मी फक्त डोळे लाऊन सह्या करणार …!

1 min read

मालेगावचे तहसीलदार _ चंद्र्जीत राजपूत

मालेगाव : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ खास प्रतिनिधी _ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका राजकीय दृष्टया खूपच गजबजलेला तालुका आहे.राजकारण म्हटले तर “घोडे विकून डांगर खातील ” पण रिस्क पूर्ण करतील मग कत्तल की रात में कत्तल क्यू न हो ? मीच निवडणार अशी भूमिका सगळ्यांचीच असते त्यामुळे न घडणाऱ्या गोष्टी सुद्धा यावेळी घडत असतात त्यामुळे पोलिस यंत्रणेला मोठी डोके दुखी असते.त्यात मालेगाव म्हटले तर अती संवेदनशील महानगर म्हणून ओळखले जाणारे शहर आहे.ह्या मालेगाव महानगर मधून आज मितीस सहा मंत्री होऊन गेलेत आणि आहेत.आज मालेगावचे भाग्य ना.दादा भुसे यांच्या मंत्री पदाने उजाडले आहे.त्यामुळे मालेगावी व मालेगाव तालुक्याचा कारभार पारदर्शक ,अचूक पद्धतीने व्हावा अशी अपेक्षा येथील नागरिकांसह शासनाची सुद्धा आहे .म्हणून मालेगाव उच्च पदस्थ अधिकारी उघड्या डोळ्यांनी , अचूक ,पारदर्शक , विना गडबड घोटाळा न करता प्रामाणिक आणि आपल्या पदाशी विशेषतः जनतेशी बेइमानी न करणारा अधिकारी मालेगाव उच्च पदस्थ खुर्चीत बसून कारभार पहाणारा असतो . परंतु ह्या सगळ्या घटनेस छेद देणारे मालेगावचे तहसीलदार चन्‍द्रजीत राजपूत ठरलेत तर दुसऱ्या घटनेत मौजे सायने खुर्द येथील गट न.१०२ जमिनीतील घोटाळा येथील अपर जिल्हाधिकारी यांच्या हातून झाल्याचे उघडकीस आम्ही काल आमच्या क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” च्या वाचकांसमोर उघडकीस आणला आहेच. जेवढे अपर जिल्हाधिकारी यांनी गडबड घोटाळा चालवला तेवढा गडबड घोटाळा तहसीलदार यांचा आहे कारण शेवटी दोघं जबाबदार अधिकारी आहेत. नुसत उंटावर बसून शेळ्या हाकणे म्हणजे काट्यात पडणे असा प्रकार ह्या दोघा अधिकाऱ्यांनी केल्याचे दिसते.आता ती वेळ च सांगणार येवढे बेजबाबदार वागणे म्हणजे तो अधिकारीच नव्हे ? जबाबदारीचे भान यांना का नसावं ? बकासुर च का बनाव ? असा संतप्त प्रश्न महाराष्ट्र न्यूज चे संपादक तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारत पवार यांनी केला असून जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करणाऱ्या अधिकाऱ्यांची उच्च पदस्थ अधिकारी यांनी कानउघाडणी करून खाते निहाय चौकशी करून जनतेस न्याय द्यावा असेही मागणी पवार यांनी केली आहे.मालेगावचे तहसीलदार यांनी काल गुरुवारी नोटीस जारी केली होती ती चक्क मालेगावच्या गट विकास अधिकारी यांना त्या नोटिशित असे आवाहन करण्यात आले होते की , ग्रामपंचायतीच्या सन 2020_ 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता बिगर अनुसूचित क्षेत्रातील येणाऱ्या ग्रामपंचायती च्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्या साठी दि.२८ / १२ / २०२१ हा दिवस निश्चित करण्यात आला आहे असे स्पष्ट उल्लेख करून तहसीलदार चन्‍द्रजीत राजपूत यांनी आपल्या पदाचे आणि कार्यभार चे भान न ठेवता बेजबाबदार पने स्वतःची सही करून ते लेटर गटविकास अधिकारी यांना देण्यात आले .खरी तारीख २८/ १ / २०२१ अशी पाहिजे होती.याची कुणकुण तहसीलदार यांना लागूनही त्यांनी जनहितार्थ दुरुस्ती दया दाखवली नाही की साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही .उलट चुकीची तारीख टाकून जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करून जनतेस संभ्रमात पाडणे हे कितपत योग्य याचा विचार करणे होणे आवश्यक आहे.असे चुकीचं असूनही तालुक्यातील जबाबदार अधिकाऱ्याने , तहसीलदारांनी सही करणे म्हणजे त्या अधिकाऱ्यां चा कारभार किती पारदर्शक आणि किती प्रामाणिक व जनतेस योग्य न्याय देणारा आहे हे त्यांच्या कारभारावरून समस्त नागरिकांना,राजकीय नेत्यांना दिसले आहेच.तरी सुद्धा जनतेने झक मारून बैठकीस उपस्थिती दाखवली आणि काही संभ्रमात पडल्या मुळे उपस्थित राहू शकले नाही असा काही नागरिकांचा सुर होता.

More Stories

2 thoughts on “मालेगाव च्या चंद्रजीत ने जित पूर्ण केली ,जनतेच्या डोळ्यात धूळ फेक केली तरीही जनतेने झक मारली बैठकीस उपस्थित राहिले मात्र तहसीलदारांनी दुरुस्तीची दया नाही दाखवली मेरी सूनो कायम ठेवली : मालेगावचे तहसीलदार चंद्र्जित राजपूत यांचा गजब कारभार मी फक्त डोळे लाऊन सह्या करणार …!

  1. फक्त एक नमुना आहे.हा तहसीलदार पात्र नाहीच, काफी करून पास झालेला दिसतो.

  2. फक्त एक नमुना आहे.हा तहसीलदार पात्र नाहीच, काफी करून पास झालेला दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.