Home Breaking वाशीत गॅस गळती वाहतूक ठप्प , अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

वाशीत गॅस गळती वाहतूक ठप्प , अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

0
101

नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी_ वाशी सेक्टर 9 मधील जैन मंदिरासमोर गटाराचे खोदकाम सुरू असताना महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्याने वाशी परिसरात गॅसच्या वासाने नागरिक भयभीत झाले. वाशी सेक्टर 9 मध्ये जैन मंदिरासमोर नवी मुंबई महापालिकेच्यावतीने गटार बांधण्याचे काम सुरू आहे. या कामाचे खोदकाम सुरू असताना त्याठिकाणी असलेल्या महानगर गॅस घरघुती पुरवठा करणाऱ्या गॅस लाईनला जेसीबीचा फटका लागला. त्यामुळे पाईपलाईन फुटली. ही घटना आज (31 डिसेंबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरु झाली. मात्र या ठिकाणी समोरच असलेल्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन गॅस आणि पाण्याचा प्रवाह सुरु ठेवला. त्यानंतर महानगर गॅसतर्फे त्या पाईपलाईनचा पुरवठा बंद करण्यात आला.
गॅस बाहेर पडत असल्याने वाशी विभागात सर्वत्र वास येत असल्याने नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर बाहेर पडले. यादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून वाशी वाहतूक पोलीस आणि वाशी पोलिसांनी त्याठिकाणची संपूर्ण वाहतूक दुसरीकडे वळवली. जवळपास एक तास सतत पाण्याचा प्रवाह या गॅस गळतीवर अग्निशमन दलाने सुरू ठेवला. तर सदर गॅस पाईपलाईनला सुमारे चार ते पाच तास दुरुस्तीला लागल्याने घरघुती गॅस आणि अवलंबून असणारे अर्ध्या वाशीतील नागरिक प्रभावित झाले सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here