कर्म.रामरावजी (अण्णा साहेब) आहेर देवळा तालुक्याचे भूषण , त्यांची राहील चिरंतर आठवण

0
265

कर्मवीर रामरावजी( अण्णा साहेब)आहेर , देवळा

देवळा : 1 जाने.21. क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज “- विशेष _ महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील ” ज्ञान महर्षी ” कर्मवीर रामराव तथा अण्णा साहेब पूंजाजी आहेर यांचा आज २७ वा स्मृती दिन. रामरावजी तथा अण्णा साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त आमच्या महाराष्ट्रातील ” महाराष्ट्र न्यूज ” वेब चॅनल च्या ” तमाम” वाचकांसाठी विशेष _ रामराव अण्णा साहेबांचा जन्म ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात झालेला त्या काळी देवळा व परिसरातील गावांचा विकास काहीच नव्हता. शिक्षणा साठी इतरत्र पायपीट करावी लागत असे ज्यांच्या घरची परिस्थिती बेताची असेल असे युवक बाहेर जाऊन शिक्षण घेत असे तेही ईच्छा असुनही पुरेसे घेता येत नव्हते कारण उच्च शिक्षणाची गंगा खूप च दूरवर शहरी भागात असे.अशावेळी ग्रामीण भागात शिक्षणाचा विकास काहीच नव्हता त्यामुळे रामराव अण्णा साहेबांनी खरी शिक्षणाची मुहर्तमेढ देवळा सारख्या अविकसित भागात रोवली.आणि ह्या मुहर्तमेढ चा चांगलाच आधार मध्यम वर्गीय यांचे बरोबरच खरा आधार गरीब मुलांना होऊ लागला.अण्णा साहेबांनी काढलेली शिक्षण संस्था आज कळवण,देवळा सटाणा तालुक्यात ” भूषण “, ठरलीय.ह्या संस्थेचे श्री.शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल ,देवळा , कर्मवीर रामरावजी आहेर आर्ट्स, सायन्स,कॉमर्स कॉलेज देवळा येथेच उच्च पदवी पर्यंतच्या शिक्षणाची सोय झालेली आहे.त्यामुळे  ह्या संस्थेने हजारो विद्यार्थी उत्तम रित्या घडवलेत आणि आज अनेक मोठमोठ्या नोकरीवर ,हुद्द्यावर  संस्थेचे विद्यार्थी विराजमान झाले आहेत.ते अण्णा साहेबांच्या कृपेमुळेच.आज ह्या संस्थेची धुरा सांभाळणारे आदरणीय हितेंद्र ( बापू) आहेर साहेब हे प्राचार्य आणि संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.बापूंच्या कारकिर्दीत देवळा शिक्षण संस्थेने अनेक मोठमोठ्या प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहेत.बापू साहेब प्रथम वेळ,स्वच्छता ,शिस्त आणि विद्यार्थी ज्ञानार्जन प्राधान्याने प्राधान्य देतात.त्यामुळे आज ही कळवण, देवळा ,सटाणा तालुक्यात यशाची परंपरा सातत्याने रोवली आहे. म्हणूनच ह्या संस्थेचे विद्यार्थी देशपातळीवर उच्च पदांवर कार्यरत आहेत.शिक्षण हे समर्थ आणि बलवान बनविण्याचे साधन आहे.विधर्थी परीक्षार्थी न राहता तो ज्ञानार्थी झाला पाहिजे ह्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य हितेंद्र (बापू)आहेर साहेब ,सचिव – गंगाधर ( मामा ) शिरसाठ आणि उपप्राचार्य आदरणीय मालती हितेंद्र आहेर ,मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्राध्यापक ,प्राध्यापिका,व शिक्षक,शिक्षिका अभ्यासाचे नियोजन करून विद्यार्थी घडविण्याचे काम मोठ्या मेहनतीने करत असतात.सद्याच्या कोरोना स्थितीत विद्यार्थी आणि पालकांनी खचून न जाता धीर देण्याचे व विध्यर्थी सू संस्कारित करण्याचे काम संस्थे मार्फत बापू साहेब,मामा साहेब आणि आहेत मॅडम यशस्वीरीत्या पार पाडत आहेत. त्यामुळे कोरोना सारख्या महामारीचा मुकाबला करताना विद्यार्थ्यांना घडविण्याचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात त्यांच्या सुसंस्कारित पद्धतीत खंड पडू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.अशा ह्या संस्थेचे” महामहीम ” कर्म.रामरावजी अण्णा साहेब आहेर यांचा स्मृतिदिन हमेशा ” चिरंतर “आठवणीत राहणारी भूषणावह बाब ठरली आहे.अशा महान शिक्षण महर्षी स विंनभ्र अभिवादन ….टिप _ अण्णा साहेबांची जाहिरात पूर्ण महाराष्ट्र भरा साठी पाहण्यासाठी करिता हे पेज वरती स्क्रोल / सरकवत जा … जाहिरात पाहून अभिवादन करा .

लेखन/ शब्दांकन : भारत पवार ,मुख्य संपादक / डायरेक्टर क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” वेब चॅनल.

राज्य उपाध्यक्ष _ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ,

नासिक जिल्हा कार्याध्यक्ष – माहिती अधिकार का.महासंघ,मुंबई ,मो.9158417131 .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here