Home Breaking आ.गणेश नाईक यांच्या मागणीला आले यश ,आयुक्त अभिजित बांगर यांनी सगळ्यांना केले...

आ.गणेश नाईक यांच्या मागणीला आले यश ,आयुक्त अभिजित बांगर यांनी सगळ्यांना केले खुश ! नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात होणार, ₹ २५ हजार बोनस आयुक्त कर्मचाऱ्यांना देणार !

0
89

नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” साठी राजू केदारे यांज कडून _
नाविमुंबईचे आमदार श्री गणेश नाईक कोविड अतिरिक्त नागरिकांच्या इतर समस्या सोडविण्या साठी दर आठवड्याला मा.आयुक्त श्री अभिजीत बांगर यांची भेट घेत असतात त्याच अनुषंगाने त्यांनी या आठवड्यात मा. आयुक्त याची भेट घेऊन त्याना नाविमुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सानूग्रह अनुदान (बोनस) लावकारात लवकर देण्यात यावा अशी मागणी केली होती . दर वर्षी महानगरपालिका आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी या सणासाठी सानुग्रह अनुदान देत असते या ही वर्षी अधीकारी आणि कर्मचारी यांना सानुग्रह देण्यात यावे करण कोविड काळात प्रत्येक पालिका कर्मचाऱ्याने खुप मेहनत घेतली आहे आणि त्यांनी केलेली कार्य उल्लेखनीय आहे व सानुग्रह अनुदान देन्याची महानगरपालिकेची परंपरा आहे. महानगरपालिकेची ही परंपरा मोडू नये या साठी आमदार गणेश नाईक यांनी मा.आयुक्त यांना सूचना वजा मागणी केली होती. दरवर्षी महानगरपालिकेच्या स्थायी समिती मध्ये सानुग्रह अनुदानाचा निर्णय होत असे, परंतु या वर्षी प्रशासकीय राज असल्या कारणाने या वर्षी कर्मचारी आणि अधिकारी यांना दिली जाणारी सानुग्रह अनुदानाची परंपरा खड्डीत होऊनये म्हणून व त्यांना न मागता बोनस मिळावा अशी मागणी त्यांनी मा.आयुक्त याना केली होती यांची ही मागणी मा.आयुक्त अभिजित बांगर यांनी मंजूर केली आहे त्यामुळे आता महानगरपालिकेच्या आस्थापने वरील अधिकारी, कर्मचाऱ्यांस रुपये २५००० व करार तथा तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना रुपये १९००० सानुग्रह अनुदान जाहीर केलेले आहे.तसेच किमान वेतनश्रेणी वर तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीने कार्यरत असनारे अधिकारी -कर्मचारी ,रोजंदारी वरील आरोग्यसेवक ,मांनधणावरीलबालवाडी शिक्षक ,सेवक यांना रुपये १९००० इतकी सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलेली आहे याशिवाय सर्वं शिक्षा अभियान ,राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासना कडून मानधन प्राप्त होणाऱ्या कंत्राटी कर्मचारी यांना रुपये १९००० तसेच आशा वर्कर यांना रुपये ९००० सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे आणि ही रक्कम येत्या दोन चार दिवसात वाटप करण्यात येणार आहे.

* बातमी तसेच   दीपावली शुभेच्छा जाहिराती साठी संपर्क करा :- * मुख्य संपादक,भारत पवार _ 9158417131, * राजू केदारे , नवी मुंबई प्रतिनिधी _9594953810

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here