भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१ देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :

एस.के. डी. चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित एस. के. डी. इंटरनॅशनल स्कूल व व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भावडे येथील विद्यार्थ्यांनी मागील वर्षांची परंपरा कायम राखत, देवळा येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी कळवण रोड ते पाच कंदील येथे भव्य मिरवणूक काढली. मिरवणुकी प्रसंगी विद्यार्थ्यांनी केलेले लेझीम नृत्य, लाठीकाठीच्या कसरतींनी देवळा परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अद्विक लोखंडे या विद्यार्थ्याने पोवाडा,अनुष्का काकुळते या विद्यार्थिनीने वक्तृत्व,तसेच नृत्य गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.विद्यालयाच्या वतीने शिवस्मारकाचे पूजन करून, विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांची आरती गाऊन कार्यक्रमाचा उत्साह वाढविला. कार्यक्रमासाठी एस.के.डी. विद्यालयाचे प्राचार्य पाटील एस.एन, व्ही.के.डी.विद्यालयाचे प्राचार्य वाघ एन.के.यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक मुद्दर सय्यद जमील,राजू देवरे,ययाती जाधव,निलेश भालेराव,ललित देवरे,किरण चव्हाण,मंजुषा शेवाळे,चेतना शेवाळे, ऐश्वर्या जाधव.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बबलू देवरे,विजू देवरे सागर कैलास यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट सादरीकरना निमित्त संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे व सेक्रेटरी मीना देवरे यांनी सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.





