भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१ देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : आंतरराष्ट्रीय प्रख्यात धावपटू कविता राऊत यांनी व्हिकेडी विद्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला तर क्रीडा क्षेत्रातील विविध खेळांविषयी प्रेरणा मिळाल्याने विद्यार्थ्यांत क्रीडा खेळाविषयीचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला असून
क्रीडा क्षेत्रातील अनुभव विद्यार्थ्यांना सांगत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला.
व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, भावडे. येथे वार्षिक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला. सलग तीन दिवस चाललेल्या क्रीडा महोत्सवात विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात धावणे, लिंबू चमचा, एक पायाची शर्यत, तीन पायांची शर्यत, बुक बॅलन्सिंग, बॉल थ्रो, रस्सीखेच, थाळीफेक, गोळा फेक, रिलेशर्यत, हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी या खेळ प्रकारांचा समावेश करण्यात आला. यासाठी विद्यार्थ्यांना प्रतापगड हाऊस, रायगड हाऊस, सिंहगड हाऊस, राजगड हाऊस या चार विभागात विभागले गेले.विद्यालयाचे शिक्षक चिंतामण जगताप (प्रतापगड हाऊस मास्टर), वंदना जाधव (सिंहगड हाऊस मास्टर), दीपिका खरे ( रायगड हाऊस मास्टर), रामराव अहिरे (राजगड हाउस मास्टर) यांनी जबाबदारी सांभाळली,यात रायगड हाऊस प्रथम क्रमांकाने विजयी झाले.या स्पर्धांनाप्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धावपटू कविता राऊत यांची उपस्थिती प्रमुख आकर्षण ठरली. तसेच सोबत नंदा पाटील ए.पी.आय.देवळा पोलीस स्टेशन, संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सेक्रेटरी मीना देवरे, व्ही.के.डी.विद्यालयाचे प्राचार्य एन.के.वाघ, एस.के.डी. विद्यालयाचे प्राचार्य एस.एन. पाटील, बबलू देवरे, कैलास सागर मंचावर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजयी खेळाडूंना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. प्रसंगी कविता राऊत यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे जीवनातील महत्त्व व खेळाच्या माध्यमातून भविष्यातील रोजगाराच्या संधी, तसेच खेळाडूंनी समस्यांवर मात करून ध्येय कसे गाठावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी नंदा पाटील व सेक्रेटरी मीना देवरे यांनीही विद्यार्थ्यांना मंचावरून मार्गदर्शन केले. संपूर्ण स्पर्धांना विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख निलेश भालेराव सहकारी शिक्षक ऐश्वर्या जाधव,चेतना शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच स्पर्धेसाठी पंच म्हणून विद्यालयाचे शिक्षक रोहित शिरसाठ,हर्षल चव्हाण, रवींद्र बागुल,महेंद्र चव्हाण, मुद्दसर सय्यद, किरण चव्हाण ,राजू देवरे,वैभव शिंदे,ललित शिरसाठ,हेमंत शिंदे यांचे सहकार्य लाभले,तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यशस्वीरित्या पार पडलेल्या स्पर्धांचे व सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सेक्रेटरी मीना देवरे यांनी कौतुक केले.





