Home Breaking व्हि.के.डी.शाळेच्या विद्यार्थ्यांची क्रिकेट खेळामध्ये राष्ट्रीय भरारी

व्हि.के.डी.शाळेच्या विद्यार्थ्यांची क्रिकेट खेळामध्ये राष्ट्रीय भरारी

0
58
Oplus_131072

भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१            देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क 

एस.के.डी चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचालित, व्ही.के.डी इंग्लिश मिडीयम स्कुल ॲण्ड ज्युनि.कॉलेज भावडे, येथील १७ वर्षांच्यातील संघाने नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धासाठी एकूण ८ संघासह राज्यातून सहभाग नोंदवला होता. अंतिम सामना कोल्हापूर विभागातील सातारा संघासोबत व्ही.के.डी संघ असा रोमांचक सामना झाला. व्ही.के.डी च्या विद्यार्थ्यांनी सातारा संघाला हरवत राज्यस्तरावर प्रथम स्थान पटकवत राष्ट्रीय पातळीवर आपले स्थान निश्चित केले.या संघात आदित्य धाकराव,ओम जाधव, सार्थक नांद्रे, ओमकार भवर,योगीराज अहिरे,चैतन्य निकम, सुयश सुर्यवंशी,आदित्य पवार, आदित्य गांगुर्डे,हार्दिक आहेर,सुजल शिंदे,राहुल पवार या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. विजयी संघाला विद्यालयाचे क्रीडाशिक्षक निलेश भालेराव,रोहित शिरसाठ,ऐश्वर्या जाधव,चेतना शेवाळे,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय देवरे,सेक्रेटरी सौ.मीना देवरे,विद्यालयाचे प्राचार्य एन.के.वाघ यांनी विजयी संघाचे कौतुक केले.बबलू देवरे,सागर कैलास यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेकडून संघाचे अभिनंदन करण्यात आले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here