Home Breaking अभिमानास्पद : एसकेडी स्कूलच्या विद्यार्थिनी राज्यस्तरावर

अभिमानास्पद : एसकेडी स्कूलच्या विद्यार्थिनी राज्यस्तरावर

0
50
Oplus_131072

भारत पवार : मुख्य संपादक  , महाराष्ट्र न्यूज              ९१५८४१७२३१                                            देवळा :  क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : देवळा तालुक्यातील भावडे येथील एस.के.डी. स्कूलच्या मुलींच्या टेनिस क्रिकेट संघाची राज्यस्तरावर निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची राज्यस्तरावर निवड होणे ही मोठी अभिमानास्पद बाब असल्याने येथील स्कूलचे संस्थापक संजय देवरे , प्राचार्य एस. एन.पाटील यांचे खरोखर मनापासून कौतुक तालुक्यात केले जात आहे.  राज्यस्तरावर विद्यार्थी , विद्यार्थिनी यांची निवड तर होतेच परंतु याला अपवाद ठरले ते एस के डी स्कूल . कारण ग्रामीण भागात वसलेल्या ह्या स्कूलने पाहता पाहता आपला शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील आलेख उंचावत ठेवला आहे. खरेतर ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना क्रीडा क्षेत्रात राज्य स्तरावर भरारी घेणे म्हणजे अभिमानास्पद आहे. त्यामुळे येथील स्कूलचे मॅनेजमेंट आणि समस्त शिक्षकांचे कौतुक होत आहे.

कांचन सुधा इंटरनॅशनल स्कूल, येवला.येथे पार पडलेल्या मुलींच्या 14 वर्षाखालील टेनिस क्रिकेट स्पर्धेत एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींच्या संघाची राज्यस्तरावर निवड झाली. या स्पर्धेत एकूण सहा संघानी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात चावरा इंटरनॅशनल स्कूल नंदुरबारच्या संघाला हरवत एस.के.डी. स्कूलच्या संघाची राज्यस्तरावर निवड झाली. या विजयी संघात अदिनी पाटील, श्रावणी आहेर, तनिष्का पगार, सिद्धी शेवाळे, अनंती आहेर, वेदिका मोरे, वेदिका केकान, शर्वरी पवार, पूर्वा निकम, अपेक्षा पवार, तन्वी पगार,जागृती कापडणीस, वेदश्री कापडणीस, काव्या सावकार, लावण्या अहिरे, या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विजयी संघाला विद्यालयाचे क्रीडाशिक्षक मुदसर सय्यद, ययाती जाधव, किरण चव्हाण, राजू देवरे, मंजुषा शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे प्राचार्य एस.एन.पाटील ,संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सचिव मीना देवरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी संघाचे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here