Home Breaking पत्रकार नसेल तर समाज आंधळा आणि मुका होईल

पत्रकार नसेल तर समाज आंधळा आणि मुका होईल

0
52
Oplus_131072

भारत पवार : मुख्य संपादक   ” महाराष्ट्र न्यूज ”                                आपल्या बातम्या / घडामोडी काही सेकंदात  महाराष्ट्रभर पोहचविण्या साठी तात्काळ संपर्क करा.   मो .९१५८४१७१३१.         

मालेगाव : क.टा. महाराष्ट्र न्यूज  ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : आज पत्रकार दिन…. सहा जानेवारी ……..  फक्त  तारीख नाही …….
तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवून सत्याच्या बाजूने उभं राहण्याची आठवण करून देणारा आजचा हा दिवस.

आज जरी पत्रकारांवर टीका होत असली,
संशय घेतला जात असला,
तरी क्षणभर मनाला विचारू या—
जर पत्रकार नसते तर
आपण सत्यापर्यंत पोहोचलो असतो का?

अंधारात प्रकाश दाखवणारा दीप,
गोंधळात दिशा देणारा मार्ग,
आवाज नसलेल्यांचा आवाज
म्हणजेच पत्रकारिता.

जगात कुठे युद्ध पेटतंय,
कुठे अन्याय होतोय,
कुठे एखादा सामान्य माणूस इतिहास घडवतोय—
हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं
ते केवळ पत्रकारितेमुळेच.

आपली समज कधी अपुरी असते,
आपले विचार कधी एकांगी असतात,
पण पत्रकारिता
त्या विषयाला खोलवर नेते,
प्रत्येक बाजू उलगडून दाखवते
आणि आपल्याला विचार करायला भाग पाडते.

आज जसं हवा नसेल तर श्वास घ्यायला जड जातं,
पाणी नसेल तर जीवन थांबतं,
तसंच पत्रकारिता नसेल
तर समाज आंधळा आणि मुकाच होईल.

पत्रकार दिवस आपण साजरा करतो
मराठी पत्रकारितेचे जनक
बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ—
ज्यांनी सत्य, निर्भीडता आणि सामाजिक भान
या मूल्यांची पायाभरणी केली.

आजच्या दिवशी
सत्तेपुढे न झुकणाऱ्या,
धोका पत्करून सत्य मांडणाऱ्या,
रात्री-अपरात्री बातमीसाठी धावणाऱ्या
प्रत्येक पत्रकाराला
मनापासून नमन आणि सलाम.

तुम्ही आहात म्हणून
आम्ही जागे राहतो,
आम्ही प्रश्न विचारतो,
आणि लोकशाही अजूनही जिवंत आहे
यावर विश्वास ठेवतो.

सत्याचा हा संघर्ष
असाच अखंड सुरू राहो,
पत्रकारितेचा दर्जा वाढत राहो,
आणि शब्दांची ताकद
कधीही कमी पडू नये… ✍️

सर्व पत्रकार बांधवांना
पत्रकार दिनाच्या हृदयपूर्वक शुभेच्छा!

— संजय  पतनानी
राजधानी ड्रेसेस, मालेगाव .

Oplus_131072

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here