भारतराज पवार : मुख्य संपादक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _ लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटना . मो. ९१५८४१७१३१ सप्तशृंगगड : क.टा.महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : अमृत पवार : रविवार दि. ७/ १२/०२५ रोजी सप्तशृंगी गडाच्या घाटात ७०० फूट खोल दरीत स्विफ्ट कार कोसळल्याने
तीन महिलांसह सहा जण दगावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी उशिरा पर्यंत आले नाही त्यामुळे येथील नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
नांदुरी ते सप्तशृंग गड घाट रस्त्यात सुमारे ७०० फुट खोल दरीत स्विप्ट कार कोसळून अपघात झाला असून घटनास्थळी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या दोन रुग्णवाहिकांसह आपत्ती व्यवस्थापन दलाचे पथक रवाना झाले असून स्थानिकांच्या मदतीने मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. अपघातात तीन
महिला तीन पुरुष यांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी जात असलेले भाविकांच्या स्विप्ट कार क्रमांक एम एच १५ बीएन ०५५५ ह्या वाहनाच्या चालकाचा ररन गडाजवळील भवरीनाला धबधबा घाट परीसरातील रस्त्यातील एका वळणावर ओव्हरटेकच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने घाटचे कुमकुवत असलेले संरक्षक कठड्याला वाहनाची जोरदार धडक बसल्यानंतर वाहन सुमारे ७०० फुट खोल दरीत कोसळल्याची माहीती असून वाहनातील तीन महिला, व तीन पुरुष असे एकूण सहा प्रवाशी भाविक असल्याची माहीती आहे. दरम्यान अपघातातील जखमींवर औषधोपचाराच्या दृष्टीने वणी ग्रामिण रुग्णालयात वैद्यकिय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. अपघात ग्रस्त वाहन सातशे फुट खोल असल्याने सप्तशृंगी देवी ट्रस्टची आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थेचे पथक, ग्रामपंचायत यंत्रणा, रोप वे ट्रॉली कर्मचारी पथक, नांदुरी ग्रामपंचायत, वन विभाग प्रशासनासह स्थानिक ग्रामस्थांनी युध्दपातीीवर मदत कार्य करीत असून अपघातग्रस्तांना मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आलेले आहे. खासदार भास्कर भगरे व आमदार नितीन पवार यांनी अपघाताची माहीती घेवून अपघात ग्रस्तांना मदतीसाठी प्रशासनास सुचना केल्या आहेत.
यावेळी सप्तशृंगी गड ग्रामपंचायत उपसरपंच संदिप बेनके व ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे अशी घटना घडली असून सार्वजनिक बांधकाम विभागावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
मृतांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल मृतांचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले असून त्यांनी दिलेल्या माहीतीनूसार वाहन चालक किर्ती पटेल, वय ५५, रशीलाबेन पटेल वय ५५, विठ्ठल पटेल वय ६५, लता विठ्ठल पटेल वय ६०, पचन पटेल वय ७०, मनिबेन पटेल वय ५५ सर्व रा. पिंपळगाव बसवंत अशी मृतांची नावे आहे. खोलदरीत मृतदेह बाहेर काढण्यास मोठी अडचण येत असून दोरखंड बांधून आपत्तीव्यवस्थापन टीम दरीत उतरुन मोबाईलच्या टॉर्चमध्ये मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे.






