Home Breaking देवळा तालुक्यातील एसकेडी स्कूलने लखनौच्या भूमीवर उंचावली महाराष्ट्राची मान, एक इतिहास

देवळा तालुक्यातील एसकेडी स्कूलने लखनौच्या भूमीवर उंचावली महाराष्ट्राची मान, एक इतिहास

0
73
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक                    देवळा :    क.टा महाराष्ट्र न्यूज  ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :

Oplus_131072
Oplus_131072

SKD International School चा नवा इतिहास!
‎लखनऊ येथे रंगलेल्या ग्रँड फिनाले डायमंड जुबिली 19 व्या राष्ट्रीय भारत स्काऊट गाईड जंबोरीत महाराष्ट्राचा मान वाढवणारी गौरवशाली कामगिरी ✨

‎लखनऊच्या भव्य भूमीवर सुरू झालेल्या 19 व्या राष्ट्रीय भारत स्काऊट गाईड जंबोरीच्या उद्घाटन समारंभात SKD International School मधील सहा विद्यार्थ्यांची महाराष्ट्राच्या Guard of Honor साठी निवड होणे हा विद्यालयासाठी अपार अभिमानाचा क्षण ठरला.
‎या विद्यार्थ्यांनी आपल्या शिस्त, निष्ठा आणि शौर्यपूर्ण उपस्थितीने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत कार्यक्रमाच्या वैभवात भर घातली.

‎या दिमाखदार सोहळ्याचे प्रमुख अतिथी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल मा. श्रीमती आनंदीबेन पटेल होत्या. त्यांच्यासोबत  राज्यांचे मंत्रीमहोदय, World Scout & Guide Association मधील मान्यवर प्रतिनिधी, Asian Pacific Scout Guide Region चे पदाधिकारी, भारत स्काऊट गाईडचे राष्ट्रीय अध्यक्ष, सर्व राज्यांचे अध्यक्ष तसेच UP पोलीस मुख्य आयुक्त यांच्या उपस्थितीने हा सोहळा अधिक थाटात पार पडला.

‎जंबोरीमध्ये ७ देशांतील स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आंतरराष्ट्रीय बंधुता, संस्कृती आणि एकात्मतेचा संदेश जिवंत केला.
‎Guard of Honour मध्ये Command Leader कौशल खैरनार, आदित्य कपडणीस, ईशा पगार, राष्ट्र ध्वज धारक रुतुजा पगार, स्काऊट-गाईड ध्वजधारक आनंदी कपडणीस, महाराष्ट्र ध्वजधारक गायत्री खैरनार या विद्यार्थ्यांनी मान्यवरांना दिलेली सलामी हा कार्यक्रमातील लक्षवेधी क्षण ठरला. त्यांची शिस्त, तालबद्धता आणि दिमाखदार उपस्थितीने संपूर्ण मैदानात महाराष्ट्राचा गौरव उजाळून निघाला.  कार्यक्रमाचे प्रसार माध्यम समन्वय आणि निवेदकांशी  क्षितिजा तेली आणि मनस्वी कदम यांनी सुबक नियोजनासह कार्यक्रमाची माहिती आणि उत्तर प्रदेश सरकारबद्दल आभारप्रदर्शन अत्यंत प्रभावी शब्दांत सादर केले.
‎या सुवर्णसंधीची निर्मिती करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी SKD Charitable Trust चे अध्यक्ष श्री. संजय देवरे सर, सौ. मीनाताई देवरे, प्राचार्य श्री. सुनील पाटील सर, तसेच सर्व समर्पित शिक्षकवृंद यांचे योगदान अनमोल ठरले.

‎SKD International School ने पुन्हा एकदा दाखवून दिले की शिस्त, गुणवत्ता आणि संस्कारांची एकजूट असेल, तर आकाशही मर्यादा ठरत नाही!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here