Home Breaking एस के डी स्कूल क्रीडा स्पर्धेत चमकले , अनंती आहेर ने प्रथम...

एस के डी स्कूल क्रीडा स्पर्धेत चमकले , अनंती आहेर ने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले

0
57
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक                      आपल्या आणि परिसरातील बातम्या , जाहिराती महाराष्ट्रातील घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात पोहोचण्यासाठी बिनधास्त संपर्क करा. संपर्क : 9158417131.                                  देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क देवळा नाशिक हायवे लगत असलेल्या भावडे येथील एस.के. डी. इंटरनॅशनल स्कूलची खेळाडू अनंती आहेर ह्या विद्यार्थिनीने नाशिक येथे झालेल्या विभाग स्तरीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत असून शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे.

अनंतीने क्रीडा क्षेत्रात एस के डी स्कूल दमदार चमकवल्याने देवळा तालुक्यातील नागरिकांकडून  स्कूलच्या सर्वच शिक्षकांचे कौतुक केले जात आहे.

नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम वरती पार पडलेल्या सतरा वर्षा खालील मुलींच्या स्पर्धेत अनेक विद्यालयातून  मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले होते. क्रीडा स्पर्धेतील हातोडा फेक ह्या खेळात तिने प्रथम क्रमांक पटकावला.सुरुवाती पासूनच आपल्या दमदार कामगिरीने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अंतिम फेरीत अनंतीने प्रभावी फेक सर्वाधिक ४० मीटर अंतरावर नोंदवली गेली.

विद्यालयाचे क्रीडा शिक्षक मुदस्सर जमील सय्यद , ययाती जाधव, मंजुषा शेवाळे , किरण चव्हाण , राजू देवरे यांनी मार्गदर्शन केले.

स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संजय देवरे , सचिव मीना देवरे , प्राचार्य एस.एन. पाटील तसेच सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अनंती आहेर चे अभिनंदन करून डेरवण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here