भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील घराघरात घरातील प्रत्येकाच्या मनामनात आपली बातमी आणि जाहिराती पोहचण्यासाठी बिनधास्त संपर्क करा. मो. ९१५८४१७१३१ मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मातोश्री चालक मालक संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्य बांधवांनी व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री ना.दादाजी भुसे यांनी एका कार्यक्रमात केले.
मालेगाव येथे एका लॉन्स मध्ये मातोश्री चालक मालक संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांचा दीपावली स्नेह मेळावा नुकताच पार पडला. यामेळाव्यात मार्गदर्शन करतांना ना.भुसे बोलत होते. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.मेळाव्यातील सर्व उपस्थितांस ना.भुसे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास चालक मालक संघटनेचे सर्व सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.





