भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी संपर्क : ९१५८४१७१३१ ” सप्तश्रृंग गडावर हजारो कावडीधारकांचा व तृतीय पंथीयांचे मेळा ”
सप्तशृंगगड : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : अमृत पवार :


सप्तशृंगीगडावर दसऱ्याला नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यामुळे आता कावडीधारकांना , तृतीय पंथीयां व भाविकांना कोजगिरी पौर्णिमेची आस लागली होती, सप्तशृंगी गडावरती हजारो भक्तांचे , कावडीधारकांचे व तृतीयपंथीयांचे आगमन होताना दिसत आहे. सप्तशृंगीगडावर कोजगिरी पौर्णिमेला महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात व इतर ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात कावडीधारक येत असल्याने हा सोहळा अद्भुत असा होत असतो.
नवरात्रोत्सवा प्रमाणेच कोजगिरी पौर्णिमा हा कावडीधारकांचा सोहळा मोठ्या उत्साहात सप्तशृंगी गडावर साजरा होत असतो. गडावर कावडी धारकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. सप्तशृंगी गडावर विविध नद्यांचे जल घेऊन आई सप्तशृंगीला जलाचा महा अभिषेक केला जातो. यात पुणे येथील मुळा नदीचे जल, साक्री पिंपळनेर येथून तापी नदीचे, ओंकारेश्वर उज्जैन इंदोर येथून नर्मदेचे, भीमाशंकर येथून भीमा नदीचे, त्र्यंबकेश्वर नाशिक येथून गोदावरीचे व भारतातील विविध ठिकाणावरून कावडीधारक सप्तशृंगी गडावरती पायी चालत पवित्र जल सप्तशृंगी गडावर घेऊन येत असतात.
कावडीधारक चारशे ते पाचशे किलोमीटर उन्हात पायी चालत सप्तशृंगीगडावर कोजागिरी पोर्णिमेच्या आदल्या दिवशी गडावरती येतात. रस्त्यावर ठिकठिकाणी कावडीधारकांसाठी दानशूर व्यक्तींकडून फराळासह पिण्याचे पाणी, चहाचे वाटप केले जाते. तसेच सप्तशृंगडावरती येणाऱ्या भक्तांसाठी विविध संस्थांकडून दूध, चहा आदींची व्यवस्था केली जाते. सप्तशृंगी गडावर येण्यासाठी नांदूरी ते सप्तशृंगी यादरम्यान एसटी बसेसची व्यवस्था केलेली आहे. तसेच मंदिरामध्ये दुरून येणारे कावडीधारकांकडून पवित्र जल घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी प्रशासन तर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.कोजागिरीला रात्री अकरा वाजता देवीला पंच अमृतासह आणलेल्या पवित्र विविध नद्यांच्या जलाने अभिषेक केला जातो.
सप्तशृंगी गडावर दिवसेंदिवस कावडीधारकांची व तृतीयपंथीयांची होत असलेली वाढती गर्दी पाहता या ठिकाणी देवी संस्थान तर्फे विविध सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.पोर्णिमा सोमवारी व मंगळवारी असल्याने मोठ्या प्रमाणात कावडीधारक व भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आली आहे. यावेळी कावडी धारकांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे.
*तृतीयपंथीयांचा मेळावा*
कावडीधारकांसह तृतीयपंथीयी देखील मोठ्या संख्येने गडावर येत असतात. त्यांचाही मेळावा येथे भरत असतो. त्याअनुशंगाने सप्तशृंगी गडावरती मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी दाखल झाले आहेत.
सप्तशृंगी देवी ही आमची कुलदैवत असल्याने याठिकाणी कित्येक वर्षांपासून मी येते. पण गडावर येणारे भाविक व आमच्या तृतीयपंथीयांसाठी सुविधा, निवासव्यस्था नसल्याने जादा पेसे देऊन रूम व पाणी उपलब्ध करून घ्यावे लागते. यासाठी शासनाने किंवा देवी संस्थानने या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.- (तृतीयपंथीय, कल्याण )
*कोजागरी पौर्णिमेनिमित्त होणारे विधी*
सोमवारी (ता. ६) : (पौर्णिमा प्रारंभ दुपारी १२.२३ मि.) सकाळी ७- पंचामृत महापूजा. दुपारी १२.३० ते रात्री ८.३०- कावडधारकांनी आणलेले जल श्री भगवती मंदिरात स्वीकारले जाते . रात्री ८.३० ते १२- श्री भगवतीचा जलाभिषेक पंचामृत महापूजा, रात्री १२-श्री भगवती महाआरती.
मंगळवारी (ता. ७) :
सकाळी ७- देवी पंचामृत महापूजा (कोजागरी पौर्णिमा समाप्ती सकाळी ९.१७ मि.)
बुधवारी (ता. ८) : सकाळी ७- पंचामृत महापूजा. सायंकाळी ७.३०-शांतीपाठानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल .
*जादा बसेसचे नियोजन*
नवरात्रोत्सवादरम्यान कार्यरत असलेली प्रशासकीय यंत्रणा, तसेच सप्तशृंगदेवी न्यास व ग्रामपंचायतीचीही यंत्रणा कावडयात्रेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. सोमवारी व मंगळवारी (ता. ७) नांदुरी सप्तशृंगगड रस्ता खासगी वाहनांसाठी बंद करण्यात येईल. महामंडळानेही नवरात्राप्रमाणेच नांदुरी ते सप्तशृंगगडदरम्यान १३० बस, तर नाशिक विभागातील ११ आगारांतून सुमारे २५० बसद्वारे भाविकांच्या वाहतुकीचे नियोजन केले आहे. दरम्यान, सप्तशृंगगडावर येणाऱ्या कावडधारक आणि पदयात्रेकरूंना विसावा, पिण्याचे पाणी व फराळ वाटपाबरोबरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक ते वणी, मालेगाव, पिंपळनेर, सटाणा, कळवण या रस्त्यांवर अनेक स्वयंसेवी संस्थांनी तयारी सुरू केली आहे.
दरम्यान कळवण ते नांदुरी रस्त्याला कावडीधारकांची गर्दी असल्याने
कळवणवरुन नाशिकला जाणार्या साठी अभोणा मार्गे वाहतूक सुरू केली आहे





