Home Breaking ….. अखेर शेतकऱ्यांचा कांदा रडलाच ! आदरणीय शरद पवार साहेब हे रडणे...

….. अखेर शेतकऱ्यांचा कांदा रडलाच ! आदरणीय शरद पवार साहेब हे रडणे आपणच थांबवाल आणि शेतकऱ्यांना वाचवाल ! कुबेर जाधव

0
59
Oplus_131072

भारतराज पवार  : राज्य मुख्यसंपादक        आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी बिधास्त संपर्क साधा.मो. ९१५८४१७१३१                      देवळा : कटा महाराष्ट्र न्यूज  ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : आदरणीय शरद पवार साहेब यांना सस्नेह नम्र निवेदन ,,, आणि साकड सुद्धा    (दि १५ सप्टेंबर) महोदय , ,,,, महाराष्ट्र राज्य हे कांद्याच्या उत्पादनात देशात अग्रेसर असुन एकुण उत्पादनाच्या ३१ % वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्रात प्रामुख्याने रब्बी,खरीप,लेटखरीप ( पोळ) या तिन्हीही हंगामात कांद्याची लागवड केली जाते,त्यात्यही मुख्येतो नाशिक जिल्हात सर्वाधिक ३० ते ३५ % उत्पादन हे रब्बी कांद्याचे घेतले जाते, कांदा हे नाशवंत पिके असल्याने कांद्याला किमान आधारभूत किंमत लाग करता येत नाही हे केंद्र सरकारचे धोरण आहे, उत्तर महाराष्ट्रासह इतरही काही जिल्ह्यांत कांदा पिक अंत्यंत संवेदनशील समजले जाते,देशा अंतर्गत कांद्याचे उत्पादन,व मागणी, तसेच दरवर्षी होणाऱ्या निर्यातीचा कमी ज्यास्त होणारा आलेख,याचा परिणाम हा बाजार पेठेतील कांद्याच्या भावावर निश्चित होत असतो, काही वर्षांपूर्वी खरीप व लेट खरीप हंगामातील कांद्याची लागवड ही महाराष्ट्र, कर्नाटक, तसेच उत्तर प्रदेशात होत होती, परंतु गेल्या ३/ ४ वर्षात मात्र मध्ये प्रदेश, राज्यस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश,पक्ष्चिम बंगाल,या राज्यासह इतरही भागात थोड्या फार प्रमाणात खरीब व लेट खरीप कांद्याची लागवड केली जात आहे,सदर राज्यातुन कमी वहातुक खर्चात व कमी कालावधीत खरीपसह, रब्बी कांद्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो, त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील दोन्हीही हंगामातील कांद्याला उठाव ( मागणी) कमी असतो,लाल कांद्याची साठवणूक क्षमता कमी असल्याने परदेशात मागणी कमी असते, तसेच या वर्षी खरीप बरोबर रब्बी कांद्याची ही मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती, परंतु दोन्ही हंगामात कधी अवकाळी पाऊस,तर कधी वाढलेल्या तापमानामुळे कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला,त्यातच मार्च एप्रिल मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी ( उन्हाळी) कांद्याला फटका बसला त्यामुळे त्याच्या साइज वर परिणाम झाला आणि साठवणूक केलेला कांदाही मोठ्या प्रमाणावर सडतो आहे, नाफेड आणि एनसिसिएफच्या तथाकथित घोटाळ्यामुळेही कांद्याच्या भावाच्या संधर्भात कायमच साशंकता व संभ्रमावस्था निर्माण होत आहे, राज्यात कांद्याच्या भावात होणारी मोठ्या प्रमाणात घसरण, आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणजे कि काय, तिन महिन्यांपूर्वी नाफेड एनसिसिएफच्या नावाखाली १०००/११०० रुपये प्रति क्विंटल भावाने खरेदी केलेला कांदा ( बफर स्टॉक) आज २४ रुपये प्रति किलो दराने मुंबई, दिल्ली,या महानगरात सर्वसामान्य जनतेला रेशनीगच्य माध्यमातून विकला जातो आहे, *माझी,आपल्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे की कांद्याच्या भावाच्या संधर्भात दिर्घ कालीन धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या डॉ सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल तात्काळ स्विकारण्याची आवश्यकता असुन त्यासाठी आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या सरकारकडे आग्रह धरावा हि कळकळीची विनंती आहे,, कळावे आपला विश्वासू ्कुबेर जाधव समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक,७८८८२४१७३४*. *सोबत १) ्. डॉ सुनिल पवार यांच्या समितीने शिफारस केलेले महत्त्वाचे मुद्दे,, २ ् कांदा उत्पादक शेतकरी व व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढलेला प्रति एकर उत्पादन खर्च ( रब्बी कांदा) व लक्षवेधी व्यंगचित्र.           प्रसिद्धी _ कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज . ९१५८४१७१३१                      

  किरण मोरे  
 सर्व व्यंगचित्र  : किरण मोरे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here