Home Breaking याचना संशयित आरोपी शिक्षण अधिकारी आणि साथीदारांची नकाहो कोठडी , मात्र आग्रह...

याचना संशयित आरोपी शिक्षण अधिकारी आणि साथीदारांची नकाहो कोठडी , मात्र आग्रह पोलिसांचा त्यास होकार कोर्टाचा भ्रष्टांचा मुक्काम पोलिस कोठडीत

0
61
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक , विलास माळी : राज्य उपसंपादक         मो . ९१५८४१७१३१   मालेगाव : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क _  मालेगाव येथील दोघा शाळेतील बोगस शिक्षक भरतीत फोकस मारणारे दोन गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेले आणि शिक्षण खात्याची अब्रू वेशीला टांगून नाशिक जिल्हा परिषद भ्रष्ट शिक्षण अधिकारी ( माध्यमिक ) प्रवीण श्रीधर पाटील ( ५०) , त्यांचे साथीदार कार्यालयीन अधीक्षक सुधीर भास्कर पगार, सोबत वेतन अधीक्षक उदय विठ्ठलराव देवरे (५२)  यांना न्यायालयाने ( दि.१३) शनिवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या तिघांनी बोगस शिक्षक भरती वर फोकस मारून घोटाळा केल्याने मालेगावच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री नाशकातून तिघांना उचलून अटक केली होती.

मालेगाव येथील या. ना.जाधव हायस्कूल मधील बोगस भरती प्रकरणाने १३ एप्रिल रोजी ०२५ रोजी गुन्हा झाला तर दुसरे मालेगाव हायस्कूल मधील बोगस शिक्षक भरती प्रकरणी २७ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.                                                                     अधीक्षक उदय देवरेची बेकायदेशीर  डेअरिंग आणि शेखर पाटील यांची फिर्याद                                       या. ना.जाधव विद्यालयातील बेकायदेशीर आणि बोगस शिक्षक भरती प्रकरणी संस्था पदाधिकारी आणि कनिष्ठ लिपिकाची भूमिका बजावणारे संदीप विश्वनाथ जाधव यांच्या विरुद्ध सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी फिर्याद दिली असल्याचे वृत्त आहे.जाधव यांची नियुक्ती बोगस असून संस्थेकडून दाखल कागदपत्रांची योग्य शहानिशा न करता त्याला वेतन सुरू करण्यात आल्याचे या गैरव्यवहार प्रकरणी देवरे यांच्यावर आरोप असल्याने त्यांना बळी पडावे लागले.पोलिसांनी त्यांना अटक केली. काल येथील वरिष्ठ स्तर सहदिवाणी न्यायाधीश एम.आर. पनाड यांच्यासमोर उभे केले असता संशयित आरोपींचे वकील व पोलिसांचे सरकारी वकील यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने तिघांनाही शनिवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

आता नकाहो मुक्काम अशी विनवणी संशयित आरोपी शिक्षणअधिकारी प्रवीण पाटील व साथीदारांनी खूपच मोठी अपेक्षा ठेऊन होती. परंतु अनेक महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्या कारणाने पुढील तपास कामी पोलिस कोठडी देण्यात यावी मागणी पोलिसांचे वकिलांनी केल्याने त्यांना कोर्टाने कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोठडीत मुक्काम करावा ( तपास कामी ) असा आग्रह पोलिसांचा होता.

Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here