Home Breaking फुले माळवाडी गावाचा समावेश खर्डे गणात करावा _ मागणी , सध्याच्या विभाजन...

फुले माळवाडी गावाचा समावेश खर्डे गणात करावा _ मागणी , सध्याच्या विभाजन प्रक्रियेबाबत ग्रामस्थांचा जोरदार आक्षेप

0
79
Oplus_0

भारतराज पवार _ राज्य मुख्यसंपादक.                      आपल्या परिसरातील बातम्या , अन्य घडामोडी,जाहिराती महाराष्ट्रातील प्रत्येक घरा घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात अवघ्या काही सेकंदात पोहोचण्यासाठी ” निर्भीड , सडेतोड ” लिखाण असणाऱ्या महाराष्ट्र न्यूज साठी संपर्क _ ९१५८४१७१३१                                                    देवळा : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  : फुलेमाळवाडी गावाचा समावेश खर्डे गणात करावा अशी मागणी गावातील सरपंच , उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तहसीलदार देवळा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सटवाई वाडी , माळवाडी व फुलेमाळवाडी ही गावे पूर्वी लोहोणेर ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट होती.कालांतराने गावांची लोकसंख्या वाढल्याने १९६६ पासून लोहोणेर ग्रामपंचायत मधून सटवाई वाडी व माळवाडी गावे विभक्त होऊन स्वतंत्र ग्रामपंचायतची स्थापना करण्यात आली. आणि १९९० पासून फुले माळवाडी गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली.सध्या स्थितीत स्वतंत्र ग्रामपंचायती असल्या तरी माळवाडी , फुले माळवाडी ही दोन्ही गावे भौगोलिक दृष्ट्या एक आहेत.माळवाडी गावी कायम वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे शेत शिवार फुले माळवाडी येथे आहे तर फुले माळवाडी येथे कायम राहणाऱ्या नागरिकांचे शेत शिवार माळवाडी गावी आहे.एकूणच स्वतंत्र ही दोन्ही गावे स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या हद्दीत असले तरी एकमेकांना पुरक आहेत.

सध्या हिच गावे वेगवेगळ्या गणात विभागली गेली असल्याने माळवाडी गाव खर्डे गणात तर फुले माळवाडी गाव वाखारी गणात विभागले गेले आहेत.या गावांची विचारसरणी , सांस्कृतिक ठेवून एक आहे. सध्या झालेल्या विभाजन प्रक्रियेबाबत आम्हा ग्रामस्थांचा आक्षेप असून वेगवेगळ्या गणात गावांचे विभाजन न ठेवता दोन्ही गावांचा समावेश खर्डे गणात करावा अशी मागणी हिरामण पंढरीनाथ शेवाळे , मा. सरपंच , फुले माळवाडी , किशोर पुंजाराम बागुल , मा. सरपंच ,माळवाडी , दिलीप रघुनाथ शेवाळे , मा. सरपंच माळवाडी , चंद्रकांत दादाजी आहेर ,सरपंच , सटवाई वाडी , विलास भामरे , मा. सरपंच स.वाडी , मयुर सुरेश बागुल , सरपंच , माळवाडी, अमोल भिवसन बागुल , माळवाडी , सुरेश नथु शेवाळे , मा. सरपंच फुले माळवाडी , विलास शिवाजी आहेर, उपसरपंच , स.वाडी आदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here