Home Breaking देवळा तालुक्यात अवैध धंदे ” सार्थकी ” झाले , मटका वाल्याने ”...

देवळा तालुक्यात अवैध धंदे ” सार्थकी ” झाले , मटका वाल्याने ” बाळस ” पकडले तपास कामात अव्वल असणारे पोलिसांना कसे नाही कळले ? की आर्थिक साट लोट ?

0
108
Oplus_131072

भारतराज पवार  : राज्य मुख्यसंपादक                       देवळा ; कटा  महाराष्ट्र न्यूज : ऑनलाईन वेब चॅनल नेटवर्क :  नुकतेच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र न्यूज मधून देवळा पोलिस ठाण्यातील पी आय. सार्थक नेहते अवैध धंद्यांचे कर्दनकाळ असे लिखाण केले होते. परंतु अवैध धंद्यांचे कर्दन काळ असलेल्या यांच्याच कार्यक्षेत्रात अवैध धंदे सार्थकी झाल्याचे कळत असून याचा पोलिसाना मागमूस नसावा की काय ? हे न पटण्यासारखे आहे. कारण कोणत्याही प्रकारच्या घटनेत तपास कामात पोलिस अव्वल असतात. हा आजवरचा तमाम जनतेचा विश्वास आहे . मग ह्या विश्वासाला तडा कसा काय जातोय ? हा प्रश्नच आहे. सगळीच खबर पोलिसांना असते तालुक्यात हे धंदे चालू आहेत हे पोलिसांना का नाही कळले ? की आर्थिक साट लोट ? असे जनतेस वाटू लागते. पोलिसांनी कर्तव्यात कटुता न ठेवता शोध मोहीम राबून अवैध धंदे बंद करून कायमचा एक आदर्श निर्माण करावा अशी मागणी होत आहे. याबाबत पोलिसांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष लागून आहे. वाचा सविस्तर लवकरच भूमिका पोलिसांची ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here