देवळा : कटा.महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील प्रख्यात पेंटर साहेबराव दादाजी पवार यांचे आज दुपारी दुःखत निधन झाल्याची बातमी मला मालेगाव येथील मित्राने मला फोन करून कळविले परंतु विश्वास बसत नव्हता.आणि बसणारच कसा ?
गेल्या शुक्रवारी आम्ही दोघं पेंटर यांच्या दुकानासमोर हितगुजच्या गप्पा मारल्या त्यांची तब्येत अगदी ठणठणीत. की यमालाच लाज वाटावी अशी आणि असे होईल असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.परंतु काही गोष्टी नियतीला मान्य नसतात असे साहेबराव यांच्या निधनामुळे वाटू लागले.
काल गॅसच्या गळती मुळे साहेबराव जखमी झाले त्यांना तातडीने नाशिक येथील दवाखान्यात हलविण्यात आले होते उपचार सुरू असतानाच आज दुपारी साहेबराव यांची प्राणज्योत मालवली त्यामुळे देवळा शहरात आणि तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
साहेबराव यांच्या विषयी थोडक्यात सांगायचे म्हणजे अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून पुढे आलेले व्यक्तिमत्व होते.अत्यंत हुशार , बोलके ,हसरे आणि देवळा पंचक्रोशी मध्ये पेंटर म्हणून नावाजलेले व्यक्तिमत्व होते.पेंटिंग कामात त्यांचा हात आजवर कोणी पकडला नाही.आणि असे हे बोलके आणि हुशार व्यक्तिमत्व आज अचानक पने सगळ्यांना सोडून गेले ह्या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाही. त्यामुळे पवार परिवारातीलच काय ? अगदी सगळ्या जनतेचे मन सुन्न करणारी घटना आहे.साहेबराव यांच्या जाण्याने दुःख तर खूप आहे पण करणार काय ? विलाज खुंटला अशी अवस्था झाली आहे. आर.पी.आय.( आठवले) पक्षाचे जिल्हा नेते शांताराम पवार यांचे साहेबराव हे मोठे बंधू. साहेबराव जरी आज आमच्या पवार परिवारात आणि समस्त मित्र परिवार, नातेवाईक यांच्यात जरी नसले तरी सुद्धा मी म्हणेन ते आमच्यात आहेत.आणि कायम राहणार .हे त्रिकाल सत्य आहे.हे सत्य कोणी नाकारू शकत नाही आणि नाकारणार नाहीत. कारण साहेबराव जरी गेले पण त्यांच्या पेंटिंग च्या रूपाने , त्यांची पेंटिंग च्या कलेने ते कायम आपल्या सगळ्यांमध्ये राहणार ते अजरामर असणार. हिच माझी बंधू साहेबराव यांना श्रद्धांजली ….! साहेबराव यांच्या पश्चात आई, पत्नी , मूल , मुली , नातवंडं , चार भाऊ , भावजयी असा मोठा परिवार आहे.
शोकाकुल : भारतराज पां.पवार , राज्य मुख्य संपादक : कसमादे टाइम्स( साप्ताहिक ) आणि महाराष्ट्र न्यूज ( वेब चॅनल – इलेक्ट्रॉनिक मीडिया ) तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती , महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष : महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन , मुंबई , नाशिक जिल्हा सेक्रेटरी : माहिती अधिकार का.महासंघ , मुंबई आणि समस्त पवार परिवार ओझर, माळवाडी ९१५८४१७१३१





