नवीन वर्षात महागाईचा फटका : गॅस सिलेंडर महागले

0
67

भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती,बातम्या आणि पत्रकार नियुक्ती साठी संपर्क मो.9158417131

नवी दिल्ली : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नवर्षाच्या स्वागतासाठी  तरुण, नागरिक आणि गृहिणी मध्ये उत्साह संचारला असताना इंधन कंपन्यांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना दर वाढीचा फटका देत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे.२०२३ या वर्षाचा पहिलाच दिवस इंधन कंपन्यांनी ग्राहकांना फटका दिला.१ जाने ०२३ पासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कंपन्यांनी बदल करण्याचा जोरदार निर्णय घेतला मात्र घरगुती सिलिंडरच्या किमतीत कंपन्यांनी कोणताही बदल किंवा भाववाढ केलेला नाही परंतु कमर्शिअल सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत कमर्शिअल गॅस सिलेंडर ची किंमत १७२१ रू.तर दिल्लीत १७६९ रू., चेन्नईमध्ये १९१७ रू.तर कोलकात्यात १८७० रू.मध्ये सिलेंडर मिळणार आहे.२०२२ मध्ये घरगुती सिलिंडरच्या किमतीत चार मोठे बदल करण्यात आल्याचे ग्राहकांनी अनुभवले आहे. एका वर्षात घरगुती सिलिंडरच्या किमतीत १५३.५० रू.ची वाढ करण्यात आली .यावेळी महिन्याच्या पहिल्या दिवशीच घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली नाही तरी भविष्यात हि वाढ सांगण्यात येत नाही ? सद्या तरी कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here