मेरी करणी, घर भरणी असले घाणेरडे राजकारण : मालेगावी कायम स्वरुपी तहसीलदार नाही शोकांतिका , आयएएस अधिकारी मुंढे यांचे बदली रेकॉर्ड मोडले महिला अधिकाऱ्यांनी त्या आहेत नाशिकच्या अतिरिक्त आयुक्त ! बदलीचे कारण काय ? वाचा सविस्तर …

0
67

भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : जाहिराती, बातम्या आणि पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा मो. 9158417131

नाशिक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : भारत पवार ; शासकीय उच्च पदस्थ अधिकारी म्हटले तर त्यांच्या बदल्या ह्या होतच राहतात विशेषतः आय ए एस ,आय पी एस झालेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत बदल्यांचे फिक्स नेटवर्क सांगता येत नाही.हे विशेष परंतु खरोखर आजच्या परिस्थितीला तुकाराम मुंढे साहेबांसारखे अधिकारी प्रत्येक क्षेत्रात असणे ही काळाची गरज आहे.आणि नेमकं आजच्या हुजेरीगिरी करणाऱ्या राजकारण्यांना हे नकोय मग काय ? करा बदल्या अशी रणरीती आखली जाते हे मात्र कायद्याला धरून नाही. या साठी जनतेने आवाज उठवला तर अशा खंबीर,निर्भिड ,कायदेशीर अधिकाऱ्यांची बदली कोणत्याही विभागात किंवा क्षेत्रात असो त्या नेमणुकीच्या ठिकाणाहून किमान तीन वर्ष बदली होत नसते.म्हणूनच बरेचसे अधिकारी अधिकार असूनही तुकाराम मुंढे होऊ शकत नाहीत हे अत्यंत वाईट आहे.कुठे आहोत आपण ? कसा मिळणार सर्वसामान्य जनतेस न्याय ? हे असले राजकारण चालत राहिले तर ? मोठी शोकांतिका आहे.नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे कायम स्वरुपी तहसीलदार नाहीत  ,येथील पंचायत समितीत कायम स्वरुपी गटविकास अधिकारी नाहीत तर मालेगाव तालुक्यातील अजंग येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने व सरपंचाने संगणमताने केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या तेथील इमानदार समाजसेवक असणाऱ्या वसंत कृष्णा अहिरे यास अद्याप न्याय मिळालेला नाही उलट त्याचेवर दबाव तंत्रच आणले जात असल्याचे आहिरे यांचे म्हणणे आहे.म्हणूनच त्यांनी नाशिक येथे आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे तर एकीकडे  वऱ्हाणे गावातील ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार आणि गावातील जागे संदर्भात हम करे सो कायद्याला वाचा फोडणाऱ्या पत्रकार न्याय न देणारे निगरगट्ट प्रशासना विरोधात सहा जानेवारी पत्रकार दिना च्या दिवशी मालेगावी उपोषणास बसण्यास पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांनी दिलेली हाक अर्थात पत्रकारावर होत असलेल्या अन्यायास प्रशासन पाणीच घालते हे किती अन्यायी आणि प्रशासनास  काळीमा फासणारी घटना आहे हे यावरून लक्षात येते.तसेच मालेगाव  धान्य वितरण अधिकारी आहेत तेही अनागोंदी कारभारामुळे काल परवा चव्हाट्यावर आले हे असं चालत राहिले तर सर्वसामान्य जनतेचे काय ? एकच जनतेनेच रस्त्यावर येणे हाच पर्याय राजकारण्यांनी शिल्लक ठेवला कारण राजकारणी ” मेरी करणी ,घर भरणी ” साठी हम करे सो कायदा ” असेच संपूर्ण राज्यात पुढाऱ्यांनी कारभार चालवलाय हे मी सांगण्या पेक्षा जनता आणि अधिकारी सुद्धा अनुभवत आहेत. सांगायचा हेतू हा की कर्तव्य दक्ष आणि कायद्यात चालणारा अधिकारी आजच्या परिस्थितीला राजकारण्यांना नकोय असे दिसते.असो .

काही अधिकारी असे असतात की ते त्यांच्या कर्तव्याला धरून,कायद्यात राहूनच कामकाज करतात सर्वसामान्य जनतेस न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात असं व्यक्तिमत्व त्यांचं असत जे फक्त त्यांच्या बदली साठी खास करून राजकारण्यांना भाग पाडते.आणि ते म्हणजे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे .त्यांची आतापर्यंत 16 वर्षांच्या सर्विस मध्ये 20 वेळा बदल्या झालेले एकमेव अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.का ? त्यांचा शिस्तीचा बडगा,कर्तव्यात कसूर नाही की कोणाची हुजेरीगिरी नाही आणि नकोय म्हणूनच ना .असा अधिकारी चालत नाही नेतेगिरी करणाऱ्यांना . अलीकडेच एकनाथ शिंदे _ फडणवीस सरकारने सहा आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.त्यात भाग्यश्री बानायत यांची नाशिक महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली.त्यामुळे नाशिक महापालिकेस कर्तव्यदक्ष ,स्वच्छ पाणी दार अधिकारी लाभले. बानायत यांची अवघ्या एका महिन्यात तीन वेळा बदली शासनाने केली आहे.म्हणून तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे रेकॉर्ड मोडणाऱ्या आयएएस अधिकारी बानायत ठरल्या असे म्हणणे वावगे ठरणार नाही.कारण कमी वेळात जास्त बदल्यांचे रेकॉर्ड  बानायत यांचे झालेआहे.

बानायत ह्या गेल्या महिन्यात शिर्डी येथे साईबाबा संस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या त्यांची विदर्भ वैद्यकीय विकास महामंडळ नागपूर येथे सदस्य सचिव पदी बदली केली होती त्यानंतर एका हप्त्यातच त्यांची नाशिक विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती .आणि आता पुन्हा महिन्याच्या आतच त्यांची नाशिक मनपाच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली.आहे की नाही स्वच्छ पाणी दार नेतृत्व करणाऱ्या आणि जनतेस योग्य न्याय देणाऱ्या अधिकाऱ्यास बदलीचा ससेमिरा लाऊन राजकारणाची चमक दाखवणारा डाव …!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here