महाराष्ट्रातील सरकार तोडून फोडून बनलेले तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद सोडावे लागेल,चीन मदारी सारखा ढोल वाजवत आहे : खा. सुब्रमण्यम स्वामी

0
66

भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा : मो.9158417131

पंढरपूर : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क हाराष्ट्रातील शिंदे सरकार तोडून फोडून बनवले असून हे सरकार अनैतिक आहे असा गौप्यस्पोट राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला.खा. सुब्रमण्यम स्वामी पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले पुढे बोलताना त्यांनी सांगितले की २०२४ च्या निवडणुकीत मतदार यांचे भवितव्य ठरवेल.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरातील कॉरिडॉर करणार याविषयी याविषयी अजून बोलायचे झाले तर त्यांना उपमुख्यमंत्री पद सोडावे लागेल असेही त्यांनी सांगितले.रामसेतू , तवांग मधील चीनची घुसखोरी ,आर्थिक संकट, काशी विश्वनाथ मंदिर , पंढरपूर कॉरिडॉर याविषयी त्यांनी सांगितले की, रामसेतूच्या मुद्यावर भाजपच्या केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे विश्वास उडाला आहे आर एस एस त्याला राष्ट्रीय वारसा बनवण्याची चर्चा करते आणि भाजप त्याचे अस्तित्व  मान्य करायला तयार नाही.सरकारने मंदिरे ताब्यात घेतले नाहीत तर भाजप मंदिरांवर सरकारचे नियंत्रण मागत आहे अशी आर एस एस ची भूमिका आहे अशा परिस्थितीत २०२४ मध्ये आर एस एस नरेंद्र मोदींना पंप्रधानपदाचे उमेदवार बनवणार का ? हा प्रश्न आहेच असेही खा. स्वामी म्हणाले.चीन हल्ल्याच्या तयारीत आहे ते आपल्या सीमेवर घुसखोरी करत आहेत आणि पंतप्रधान मोदी मीटिंग घेत आहेत चर्चा करण्या बद्दल बोलत आहेत राक्षसांसोबत काय चर्चा करणार ? चीनला चर्चेची भाषा कळते का ? चीन मदारी सारखा ढोल वाजवत आहे घुखोरी बाबत पंतप्रधान काहीच बोलत नाहीत असेही स्वामी म्हणाले.स्वामी यांनी पंढरपूर कॉरिडॉरला विरोध केला कॉरिडॉर होऊ देणार नाही असेही ते म्हणाले.देवेंद्र फडणवीस जास्त बोलले तर उपमुख्यमंत्री राहणार नाहीत.पंढरपूर मध्ये विमानतळाची नितांत गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.चंद्रभागा नदीचे शुध्दीकरण अधिक महत्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here