
भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती व बातम्या साठी तसेच पत्रकार नियुक्ती साठी इच्छुकांनी संपर्क करा.मो.9158417131
नाशिक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : तानसेन ननावरे : गेल्या पाच पन्नास वर्षा पासूनची परंपरा नागपूरचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची व त्या साठीच सत्ताधारी पक्ष मग तो कोणत्याही पक्षाचे असो त्यांचा कल अधिवेशन कमीतकमी वेळात गुंडाळण्याचाच. असतो करोना महामारी मूळे गेली तीन वर्ष नागपूर अधिवेशन झालेच नाही मध्य प्रांता बरोबर झालेल्या करारा मूळे नागपूरला उपराजधानी व किमान एक विधान सभा अधिवेशन नागपुरात घेण्याचे बंधनकारक असल्या मूळे ते घ्यावयास भाग पडते
त्या नुसार नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे तर दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे लोकसभेत. कलम 193. अन्वये अमली पदार्थ विषयावर चर्चा सुरु असताना बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे तरुण तडफदार खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांत राजपूत व दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अमली पदार्थ व त्याचे व्यापारी तसेच अमली पदार्थाचे सेवन करणारे जबाबदार असल्याचे मत मांडले त्या तपासात
AU. उल्लेख असलेली व्यक्ती कोण आहे. आदित्य उद्धव आहे का असा सवाल उपस्थित केला व मोठा गहजब माजला दिल्लीतल्या संसदेची चर्चा नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनात आली उद्धवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधान सभेत गोंधळ माजवला त्यात भास्कर जाधवला बोलू द्या अशी तिन्ही पक्षाकडून मागणी होतहोती सभापती नार्वेकरांनी मोजून तीन वेळा सभा तहकूब केली
तो पर्यंत शांत बसून असलेले जयंतराव पाटील आक्रमक झाले विरोधी पक्ष नेता पदाचा हाता तोंडाशी आलेला घास ऐनवेळी अजित पवारांनी हिसकावल्या मूळे अलीकडे जयंतराव नाराज आणि हिरमुस झाल्या सारखे वाटायचे एरवी शांत सुस्वभावी अभ्यासू जिज्ञासू संयमी असणाऱ्या जयंतराव पाटलांनी सभापती नार्वेकरांना निर्लज्जपणा करण्याचा आरोप केला नार्वेकरांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेल्याचा राग असावा मी कुणाचेही नाव घेतले नाही तसेच मी संभापती नार्वेकरांनाही बोललो नाही असा बचावाचा पवित्रा घेतला विधानसभा आमदारकीचा व मंत्री पदाचा दीर्घ अनुभव असलेल्या जयंत पाटील साहेबाना हे कुणी सांगावे विधान सभेतील हरेक वक्त्यव सभापतीला सम्बोधुन करावयाचे असते अखेर विधान सभेत ठराव मंजूर करून जयंत पाटील यांना. नागपूर हिवाळी अधिवेशन कार्य काळासाठी निलंबित करण्यात आले आहे निलंबित पाटील यांचा राष्ट्रवा दिच्या आमदारांनी त्यांना उचलून धरीत जल्लोशात स्वागत केले लोकशाही व साविंधान वाचविण्याच्या बाता मारणाऱ्या काँग्रेस पक्षाला विधानसभा अध्यक्षाला निर्लज्ज म्हणणाऱ्या जयंत पाटील यांचा सत्कार करण्याचा अर्थ काय घ्यायचा
भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरना नंतर विधान सभेत एका आचरण व नीती मूल्य समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे नीती मूल्याची चाड असलेले आमदार आचरणाची साथ देतील का असा सवाल उपस्थित होतोय .
