म.गांधी विद्यामंदिर प्रशासनाने जागे साठी दिला होता नकार त्याच जागेवर मालेगावच्या इतिहासात प्रथमच पं.श्री.प्रदिपजी मिश्रा मालेगावात दाखल, लाखोंचा जनसागर

0
68

भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क मो.9158417131.                                मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :   शिव महापुराणाच्या जागेसंदर्भात हिरे कुटूंबीयांकडून श्रद्धाळू भाविकांच्या भावनांची केली गेली पायमल्ली…..तरी सुद्धा ….

मालेगावच्या इतिहासात प्रथमच पं.श्री.प्रदिपजी मिश्रा यांचे मधुर वाणीतून पुण्य श्री शिव महापूराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. पुण्य श्री शिव महापूराण कथा श्रवणासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून लाखो भाविक येत आहेत, या पुण्य श्री शिव महापूराण कथेचे आयोजन मालेगावचे वैभवात भर टाकणारे आहे.

या महापर्वाचे आयोजकांच्या वतीने मालेगांव शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणारे “एकात्मता चौक जॉगिंग ट्रॅकचे मैदान” निश्चित करण्यात आले. यासाठी महात्मा गांधी विद्यामंदीरकडे रितसर परवानगी मागण्यात आली होती. मात्र यातील धक्कादायक बाब म्हणजे महाविद्यालयाने परवानगी तर नाकारलीच उलट जिल्हाधिकारी व मालेगांव कॅम्प पोलीस स्टेशन,मालेगांव यांना पत्र देवून येथील कार्यक्रमाच्या जागेला विरोध दर्शविला होता.

हिंदू धर्माचे श्रध्दास्थान भगवान “शिव” यांच्या पुण्य श्री शिव महापूराण कथेला होणारा विरोध म्हणजेच हिंदुत्वाला विरोध. हिरे कुटूंबीयांकडून विकासाचे राजकारणा ऐवजी हिंदुत्वाला विरोधाचे राजकारण केले गेले आहे, त्यामुळे श्रद्धाळू भाविकांच्या भावनांची पायमल्ली त्यांचेकडून  झाली हे सत्य नाकारून चालणार नाही . एकात्मता चौक,जॉगिंग ट्रॅकचे मैदान हे शासनाकडून नाममात्र भाडेतत्वावर महात्मा गांधी विद्यामंदीरने कराराने घेतले असले तरी मालकी ही शासनाची आहे, अर्थात जनतेची आहे. करारा प्रमाणे जनतेला आवश्यकता असेल त्यावेळी हे मैदान उपलब्ध करुन देण्याची अट टाकण्यात आलेली आहे. तरी ही हिरे कुटूंबीय मैदान जणू स्वतःच्या मालकीचे असे समजुन शिवमहापुराणास मैदान मिळू नये म्हणून केविलवाणा प्रयत्न केला गेला परंतू हिरे कुटूंबीयाच्या विरोधाला जुगारुन सर्व भाविकांच्या सोयीसाठी “पुण्य श्री शिव महापूराण कथा” एकात्मता चौक जॉगिंग ट्रॅक मैदानातच होणार आणि त्याबाबत जय्यत तयारी केली गेली असून याची सत्यता आज लाखो च्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या ओघ ह्याच मैदानाकडे तमाम मालेगाव वासियांना दिसत असून मालेगाव करांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा कार्यक्रम असून हा मोठाच योग म्हणावा लागेल असे मालेगावच्या जनतेत कुतूहलाने चर्चा होत आहे.तर जिल्ह्यातील तमाम जनतेचे ह्या  दुग्ध शर्करा कार्यक्रमाचे लाखोच्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here