मालेगाव तालुक्यात दंगल भडकली ,जोरदार दगडफेक, लाठ्या ,काठ्या तुफान राडा : गावात तणावपूर्ण शांतता,घटनास्थळी पोलिस तैनात
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : मो. 9158417131

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल सर्वत्र शांतेत पार पडला असला तरी जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात भयंकर दंगल भडकल्याने गावात मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
याबाबत महाराष्ट्र न्यूज च्या पोलीस सूत्रांकडून हाती असलेल्या वृत्तानुसार समजते की,मालेगाव तालुक्यातील रो टोकडे गावातील ग्रामपंचायतीचे इलेक्शन अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडले होते काल निकाल जाहीर होताच भाजप ची पूर्ण पॅनलसह सरशी झाल्याने सरपंच पदासह सर्वच भाजप चे उमेदवार निवडून असल्याने विजयी उमेदवारांनी गावातून फेरी काढल्याने विरोधक आणि विजयी उमेदवारांत शाब्दिक चकमक उडाली त्याचे पर्यवसान भांडणात होऊन तुफान दगडफेक लाठ्या काठ्या यांचा वापर जोरदार करण्यात आला ह्या घटनेची खबर तालुका पोलिस स्टेशन यांना मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील ,पीएसआय विशाल पाटील,मोहित मोरे यांनी तात्काळ पोलीस फौज घेऊन टोकडे गावी धाव घेऊन दंगल सदृश्य परिस्थिती नियंत्रणात आणली व पुढील अनर्थ टळला जर पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहचले नसते तर मोठाच अनर्थ घडला असता अशी चर्चा गावात काहींच्या तोंडून ऐकवास मिळते आहे. सध्या गावात तणाव पूर्ण शांतता असून पोलीस तैनात करण्यात आले आहेत.पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.