त्या पवार गुंडांनी किरण वाघ यास लाथा बुक्क्यांनी बेदम मारले अखेर त्यास यमसदनी धाडले,सटाणा तालुक्यात हळहळ तर नामपूर वासियात संताप ,पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला

0
68

भारत पवार : मुख्य संपादक संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत इच्छुकांनी संपर्क करावा तसेच जाहिरात आणि बातम्या साठी बिनधास्त संपर्क करा ” सडेतोड आणि निर्भिड लिखाणा साठी ” महाराष्ट्र न्यूज ” मो.9158417131 वाचक संख्या : एक लाख,११ ह.पेक्षा अधिक 

नामपूर : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील नामपूर येथे काळजाला छेद पाडणारी घटना घडल्याने गरीब कुटुंबातील करत्या मुलास आपल्या आई ,पत्नी आणि दोन लहान मुलांना कायमचे सोडून जावे लागल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून नामपूर गावातील नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक भारतराज पवार यांनी मयत किरण वाघ यांच्या घरी भेट दिली असता तेथील ज्येष्ठ नागरिक पोपटराव वाघ,मनोज कांबळे,शेखर केदारे,वडणेरचे सुरेश वाघ,हेमंत शिरसाठ ,प्रवीण वाघ यांनी यावेळी सांगितले की,किरण वाघ यास जितेंद्र कृष्णा पवार,राजेंद्र गोपा पवार ह्या गुंडांनी काहीही कारण नसताना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून बेहोश पाडले याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील इंदिरा नगर परिसरात एक महिन्यापूर्वी १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वा.दरम्यान  मदिरा ( दारू) घेतलेल्या बंधारपाडा गल्लीतील तरुणांमध्ये झालेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या किरण वाघ याचा राग असल्याने तू आमच्या भांडणात भाग का घेतला म्हणून त्यास छातीत,पोटात जितेंद्र पवार,राजेंद्र पवार यांनी लाथा बुक्क्यांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली त्यास नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील उपचारार्थ मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले तिथेही त्याच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आम्ही जायखेडा पोलिसात धाव घेतली फिर्याद दाखल करून घेतली परंतु  एवढे घडूनही संशयित आरोपी मोकाट फिरत होते अखेर आम्ही मातंग समाजाचे मुंबई येथील नेते राजाभाऊ सूर्यवंशी यांना घटनेचे गांभीर्य फोन द्वारे सांगितले त्यांनी जायखेडा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना घटनेचे गांभीर्य फोन द्वारे विशद केले त्यानुसार पोलिसांनी भा. द. वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ अन्वये जितेंद्र कृष्णा पवार, राजेंद्र गोपा पवार यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार चालू असता मृत्यूची झुंज देणारा किरण वाघ काळाच्या पडद्याआड झाला अखेर त्याची प्राणज्योत मालवली असे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले .घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक पारधी ,उपनिरीक्षक तुषार भदाणे, यांनी तातडीने वाढीव कलम ३०२ दाखल करून संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

यावेळी अण्णा पगारे ( ठेंगोडा), संजीवन वाघ _ अध्यक्ष मातंग सेवा संघ, दगाजी अहिरे ,उपाध्यक्ष,मालेगाव,मनोज कांबळे _ अध्यक्ष अण्णाभाऊ साठे फाउंडेशन, नामपूर,दिनकरराव लांडगे _ अण्णाभाऊ साठे फाउंडेशन जिल्हाध्यक्ष ,भारत वाघमारे _ सत्यशोधक बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष,पोपटराव वाघ ‘ ज्येष्ठ नागरिक संघ नेते,दीपक पान पाटील _लहुजी सेना अध्यक्ष देवळा शहर आदींनी मुत किरण वाघ यांच्या घरी भेट देऊन घटनेचा निषेध व्यक्त करून गुंडगिरी खपून घेतली जाणार नाही गुंडगिरी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी वेळीच त्यांचेवर कठोरात कठोर कारवाई केल्यास अशा घटना घडणार नाहीत आणि संशयित पवार गुंडांना फाशीची सजा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी करून याबाबत आम्ही पाठपुरावा करू असेही त्यांनी सांगितले. मयत वाघ यांच्या पाठीशी आई,पत्नी आणि दोन लहान मूल असल्याने गावात हळहळ व्यक्त होत असून नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे…… ( मयत किरण वाघ यांची पत्नी दोन लहान मूल आणि नातेवाईक छायाचित्रात दिसत आहेत )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here