उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगाव तर्फे देवळा येथे हेल्मेट जनजागृती मोहीम संपन्न
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा तसेच जाहिरात आणि बातम्या साठी संपर्क साधावा .मो.9158417131

देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हेल्मेट जनजागृती मोहीम आर. टी. ओ.कार्यालया मार्फत सुरू करण्यात आली असून टु व्हिलर चालकांनी हेल्मेट आवर्जून घालून टु व्हिलर चालवावी असा संदेश जनजागृती फेरी काढून जनतेस देण्यात येत असून यास जनतेने प्रतिसाद न दिल्यास त्यांचेवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आर टी ओ प्रशासनाने कळविले आहे. याच अनुशंगाने मालेगाव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या सौजन्याने देवळा येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येऊन उपस्थित दु चाकी स्वारांनी हेल्मेट घालून देवळा शहरात मुख्य रस्त्यांवर रॅली द्वारे जनतेचे लक्ष वेधून जनतेपर्यंत संदेश पोहच केला.३१ डिसेंबर ०२२ पर्यंत हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात येणार असून दू चाकी चालविणाऱ्यानी याबाबत दक्ष होऊन हेल्मेट परिधान करावे असे आवाहन परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी यावेळी केले. अन्यथा ०१ जाने २३ पासून दंडात्मक कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मो.वा.नि.सचिन बोधले, स.मो.वा.नि.जावेद शेख,श्री घोलप, सुवर्णा देवरे ,वसावे आदी अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवळा मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक दिनेश सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.