महापुरुषांनी कोणाकडे भीक मागितली याचे पुरावे चंद्रकांत पाटील यांनी जनतेसमोर मांडावेत ,स्वतः डॉ.बाबासाहेबांच्या सिद्धार्थ महाविद्यालयात शिकलात याचेही भान ठेवावे

0
60

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा तसेच जाहिरात आणि बातम्या साठी संपर्क : मो. 9158427131                    पुणे : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करून पूर्ण देशात जनतेत असंतोष पसरून दिला आहे त्यामुळे पाटलांनी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील शांतता भंग केल्याचे दिसत आहे. चंद्रकांत पाटील अर्थात चंपा यांनी  केवळ बहुजन समाजाच्या महापुरुषांना त्यांच्या कार्य कर्तुत्वाला अपमानित केलेलं नाही,तर त्यांचा अजेंडा बहुजन समाजातील मुलं शिकू नयेत असा आहे,त्याचं पूर्ण वाक्य म्हणजे तुम्हाला सरकारवर अवलंबून राहायची गरज काय?

चंद्रकांत पाटील म्हणाले,या देशात शाळा सुरु कुणी केल्या, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरु केल्या. महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही.त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू केली मला पैसे द्या, आता त्या काळी १० रुपये देणारे होते. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत ना?”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटलांनी वरील विधानाचे पुरावे देशातील जनतेसमोर मांडावेत. महापुरुषांनी कुणीकडे भीक मागितली पुरावे द्यावेत.

चंद्रकांत पाटील ज्या सिद्धार्थ महाविद्यालयात शिकले त्या महाविद्यालयाच्या दोन इमारती ‘आनंद भवन’ आणि ‘बुद्ध भवन’ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याकाळी “खरेदी केलं आहे.” तो पैसा वित्तसंस्थेकडून कर्ज स्वरूपात घेतला होता. वडाळा येथील डॉ आंबेडकर महाविद्यालय त्याची जागा सुद्धा विकत घेतली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विस्तार तिथून झालाय नंतर औरंगबाद चं मिलिंद महाविद्यालय,चंद्रकांत पाटलांना हे वास्तव माहित नाही का?

त्यावेळी पोलादी पुरुष असणाऱ्या सरदार पटेलांच्या छातीत जळजळ झाली होती,तेव्हा त्यांनी विचारणा केलेली की कर्ज मंजूर कसं झालं.नंतर त्यांना माणुसकीचं इनो वगैरे दिलं गेलं असेल,असो.

महात्मा फुले तर व्यावसायिक होते,काल त्यांच्याबद्दलची माहिती अनेकांनी दिली आहे.भाऊराव पाटलांनी उभी केलेली रयत शिक्षण संस्था सुद्धा त्याबद्दलही लोकांनी माहिती दिलीय,तिथं शिकणारे लोकही नंतर आपली जबाबदारी म्हणून संस्थेला मदत देत आलेत.आईला मदत करणे भीक नसते ती जबाबदारी असते.
ज्यांची संस्कृती म्हाताऱ्या आई बापांना आश्रमात सोडून पळून येण्याची आहे त्यांना जबाबदारी अन भीक यातला फरक कधी कळणार नाही.

बाळ टिळक आणि गोपाळ आगरकरांना तुरुंगवास झाला होता,त्यावेळी टिळकांकडे जामीन साठी पैसे नव्हते. महात्मा फुले यांनी दहा हजार रुपयांचा जामीन दिला होता, याची नोंद आहे. पण स्वातंत्र्यलढ्याच्या पुढील काळात टिळकांनी महात्मा फुले यांना अनुल्लेखाने इतकं टाळलं, की केसरीमध्ये महात्मा फुल्यांच्या निधनाची बातमीही सापडत नाही.

म्हणून तुमच्या या अशा उत्तुंग माणुसकी आणि मानवतावादी वागण्याला बहुजन समाज शिव्यांची लाखोली वाहून उपकृत करत असतो.महापुरुषांची बदनामी केल्याशिवाय तुमच्या घशाखाली घास उतरत नसावा.कारण तुमच्याकडे कोणताही महापुरुष नाही,ज्याचे कार्य कर्तुत्व तुम्हाला सांगता येईल,म्हणून बहुजन समाजातील महापुरुषांच्या प्रती सतत द्वेष ईर्षा मत्सर सगळे विकार अन विखार प्रकट होत राहतात.

शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे.ती मदत नाही मेहरबानी नाही,ते कर्तव्य आहे.घटनेत त्याची तरतूद आहे.तुम्ही घटना मानीत नाही म्हणून तुम्हाला घटनेत काय लिहिलं आहे ते माहित असण्याची सुतराम शक्यता नाही.

तुम्हाला शिक्षण बंद करायचं आहे.मराठी शाळा बंद होत आहेत,पण मराठीच्या नावाने राजकारण करणारे तोंडे शिवून गप्पगार आहेत. कारण बहुजन समाजाने शिकावं असं त्यांना कधीही वाटलं नाही,तुम्ही सगळे एका माळेचे मणी आहात. बहुजन समाजातील नादान तरुणांनी यांचे अजेंडे ओळखण्याची गरज आहे.

टाटा अदानी अंबानी यांना कवडीमोल भावात जमीन वीज पाणी देताना ते भीक म्हणून दिलेलं आहे की तुमच्या शेटजी भटजी अजेंड्याचा भाग आहे हेही एकदा जाहीर करा,आमच्या घामाच्या पैशातूनच हे लोक गडगंज झालेत.नव्हे तुम्ही केलेत.
ती आम्ही दिलेली भीकच जी इथल्या फुटपाथवरचा माणूसही बिस्किटचा पुडा विकत घेऊन तुम्हाला कर रूपाने देतो तीच भीक, आणि तीच भीक ज्यातून तुमचा तिरसिंगराव राजा बाबू दहा दहा लाखाचा सूट घालून फिरतो तीच भीक आहे,इथल्या गोर गरीब जनतेने दिलेली,नव्हे तुम्ही लुटलेली.

(काही संदर्भ – बीबीसी मराठी )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here