धनगर समाजातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ बँक खात्यात जमा करा : अभिलाल देवरे

0
66

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा तसेच जाहिरात आणि बातम्या साठी संपर्क मो.9158417131

धुळे : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :  धनगर समाजाचे उत्तर महाराष्ट्र युवा कार्याध्यक्ष अभिलाल  देवरे यांचा राज्य शासनाला इशारा. धनगर समाजातील N.T व एस बी सी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची सन २०१७ ते २०२२ मधील प्रलंबित निर्वाह भत्ता व शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. व संस्था चालकांकडे पालकांनी भरलेली फी पालकांना परत देण्यात यावी. त्या बाबत. (संदर्भ- दि. 5/9/2022 / दि. 14|11|2022 रोजी मा. मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धुळे येथे निवेदन दिले होते.) आज पत्र क्र. 3 दि. 9 डिसेंबर 2022 रोजी धुळे जिल्हाधिकारी व समाज कल्याण आयुक्त यांच्यामार्फत  नरेंद्र मोदी प्रधानमंत्री,  एकनाथ शिंदे  मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस  उपमुख्यमंत्री,  दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री या सर्वांना  प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब खेमनार व उत्तर महाराष्ट्र युवा कार्याध्यक्ष अभिलाल देवरे, धनगर समाज युवा मल्हार सेना व सर्वपदाधिकारी, विद्यार्थी व सर्व विद्यार्थ्यांचे पालक यांनी  पत्र  दिले. २०१७ ते २०२२ पासुन ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संस्था चालकांकडे शिष्यवृती फि भरलेली आहे ती पालकांना परत देण्यात यावी. शासनाच्या परपत्रानुसार NT, एसबीसी व मागासवर्गीय सर्व विद्यार्थ्यांची फी संस्था चालकांनी परत द्यावी. आणि राज्य शासनाने सदर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती फी व निर्वाह भत्ता तात्काळ 2017 ते 2022 परत थकीत असलेली शिष्यवृत्ती शासनाने तात्काळ संस्था चालकांना द्यावी. राज्य शासनाने शिष्यवृत्ती आज पर्यंत संस्था चालकांकडे वर्ग केली नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे. संस्था चालक पालकां कडे मागणी करतात. तुम्ही आता फी भरा शासन ज्यावेळेस तुम्हाला शिष्यवृत्ती देईल त्यावेळेस आम्ही परत करू. त्या शासनाच्य अलगरजी पणामुळे वेळकाळे धोरणामुळे विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. तरी राज्य शासणाने तात्कळ 2017 ते 2022 मध्ये थकीत असलेली निर्वाह भत्ता व शिष्यवृती बँक खात्यात तात्कळ जमा करावी. अन्यथा आम्ही प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब खेमनार, अभिलाल  देवरे उत्तर महाराष्ट्र युवा कार्याध्यक्ष, व विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक  व महाराष्ट्रातील धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या वतीने धुळे ते मंत्रालया पर्यंत पायी चालत मोर्चा काढणार होणाऱ्या परिणमाची जबाबदारी प्रशासनाची राहील असे खेमनार व देवरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here